Join us  

काय सांगता ! 'भाबीजी घर पर हैं' मालिकेतून नेहा पेंडसेचा पत्ता कट, नवीन अनिता भाभी येणार मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 3:50 PM

टीव्ही जगतातील एक लोकप्रिय शो 'भाभीजी घर पर हैं (Bhabiji Ghar Par Hain!)’' पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

टीव्ही जगतातील एक लोकप्रिय शो 'भाभीजी घर पर हैं (Bhabiji Ghar Par Hain!)’' पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही वर्षांपूर्वी शिल्पा शिंदे (Shilpa Shinde)ने या मालिकेला रामराम केले होते, त्यानंतर सौम्या टंडननेही कोरोना साथीनंतर मालिका सोडली.  त्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे (Nehha Pendse) ची एंट्री या मालिकेमध्ये झाली.  या मालिकेत ती  'अनिता भाभी'ची भूमिका साकारत आहे. नेहाच्या आधी ही भूमिका अभिनेत्री सौम्या टंडन(Saumya Tandon)ने वर्षानुवर्षे साकारली होती. पण, आता नेहा पेंडसेने 'भाबी जी घर पर हैं' मालिका सोडणार आहे. 

नेहा पेंडसे लवकरच शो सोडणार असल्याचे बोलले जात होते, अशा परिस्थितीत निर्मात्यांनी नवीन 'अनिता भाभी'चा शोध सुरू केला आहे. पण, आता बातमी अशी आहे की, मेकर्सचा नवीन अनिता भाभीचा शोध संपला आहे. 'भाबीजी घर पर हैं'मध्ये गोरी मेमची जागा कोणती सौंदर्यवती घेणार आहे, हे जाणून घेण्याची चाहत्यांनाही उत्सुकता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आता फ्लोरा सैनी शोमध्ये अनिता भाभीच्या भूमिकेत दिसणार आहे.

E-Times च्या वृत्तानुसार, निर्मात्यांनी 'अनिता भाभी' च्या भूमिकेसाठी फ्लोरा सैनीशी संपर्क साधला आहे आणि जर सर्व काही ठीक झाले तर फ्लोरा आता नवीन गोरी मेम बनून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. वास्तविक, सौम्या टंडनने शो सोडल्यानंतर, निर्मात्यांनी फ्लोरा सैनीला ही भूमिका ऑफर केली होती, परंतु नंतर तिने ते करण्यास नकार दिला, त्यानंतर ही भूमिका नेहा पेंडसेच्या झोळीत पडली.

तथापि, अद्याप निर्मात्यांनी फ्लोरा सैनीच्या नावावर मोहर लावलेला नाही. कारण, अभिनेत्रीकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. फ्लोरा सैनी टेलिव्हिजन शोसह काही मोठ्या चित्रपटांचा भाग आहे. ज्यामध्ये दबंग 2, स्त्री आणि बेगम जान सारख्या चित्रपटांची नावे समाविष्ट आहेत. यामध्ये फ्लोरा महत्त्वाच्या भूमिकेत दिसली आहे. 

टॅग्स :नेहा पेंडसेभाभीजी घर पर हैटिव्ही कलाकार