Join us

लग्नाच्या पत्रिका छापल्या, लेहेंगाही होता तयार; मग शेवटच्या क्षणी मराठमोळ्या अभिनेत्रीने का मोडलं स्वत:चंच लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 15:43 IST

लग्नाची सगळी तयारी झाली होती, पण ऐनवेळी अभिनेत्रीनेच लग्न करण्यास दिला नकार

सेलिब्रिटींचं लग्न हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. आयुष्यातील या खास क्षणाची सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीही वाट बघत असतात. मोठ्या दिमाखात सेलिब्रिटींचे शाही विवाहसोहळे पार पडतात. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मेहेंदी सोहळ्यापासून ते सप्तपदीपर्यंत सेलिब्रिटींचं लग्न म्हणजे चर्चेचा विषय असतो. पण, एका प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने मात्र लग्नाची सगळी तयारी झालेली असताना स्वत:च लग्न मोडलं. 

'भाभीजी घर पर है' या मालिकेतून अभिनेत्री शिल्पा शिंदे घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. करिअरमध्ये सक्सेस मिळवलेल्या शिल्पाचं लव्ह लाइफ मात्र अपयशी ठरलं. शिल्पा शिंदे अभिनेता रोमित राजसह रिलेशनशिपमध्ये होती. मायका या मालिकेत त्यांनी एकत्र काम केलं होतं. काही वेळ डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णयही घेतला होता. पण, ऐनवेळी शिल्पाने लग्न करण्यास नकार दिला. खुद्द अभिनेत्रीच एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. 

"मी माझ्या लग्नासाठी सगळं काही सोडून दिलं होतं. माझा होणारा नवरा आणि त्याच्या कुटुंबाप्रती माझ्या काय जबाबदाऱ्या आहेत, हे मला माहीत होतं. त्याच्या इच्छेनुसार मी सगळं काही करायचे. मी त्याच्या कुटुंबीयांचाच विचार नेहमी करत राहायचे. पण, त्याच्या यापेक्षा जास्त अपेक्षा होत्या.  माझ्या लग्नाची सगळी तयारी झाली होती. माझं लेहेंगाही तयार होता. मी ज्वेलरीही खरेदी केली होती. लग्नाच्या पत्रिकाही छापल्या होत्या. पण, मला माझं लग्न मोडावं लागलं," असं शिल्पाने सांगितलं होतं. 

पुढे ती म्हणाली, "लग्नाच्या १ महिनाआधी मी लग्न मोडलं. पण, हा निर्णय योग्य होता. प्रत्येक गोष्टीसाठी मला तडजोड करावी लागणार नव्हती. म्हणून मी खूश आहे. मी माझे निर्णयही स्वत: घेऊ शकते". त्यानंतर अजूनही शिल्पा अविवाहित आहे. तर रोमितने २०१०मध्ये टीना कक्कडशी विवाह करत संसार थाटला. 

टॅग्स :शिल्पा शिंदेटिव्ही कलाकारसेलिब्रिटी