Join us  

‘बाईपण भारी देवा’मधील सुचित्रा बांदेकरांचा मॉर्डन लूक पाहून अशी होती लेकाची प्रतिक्रिया, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 1:56 PM

‘बाईपण भारी देवा’मधील सुचित्रा बांदेकरांचा मॉर्डन लूक सोहम बांदेकर म्हणाला...

बहुचर्चित ‘बाईपण भारी देवा’ या मराठी चित्रपटाने सर्वत्रच धुमाकूळ घातला आहे. सहा बहि‍णींची अनोखी गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. सध्या जिकडेतिकडे या चित्रपटाचीच चर्चा आहे. या चित्रपटात काकडे सिस्टर्सपैकी एक असलेली पल्लवीची भूमिका अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी साकारली आहे. या चित्रपटात सुचित्रा बांदेकर यांचा वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. त्या पहिल्यांदाच मॉर्डन लूकमध्ये स्क्रीनवर दिसल्या आहेत.

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील सुचित्रा यांचा हटके अंदाज प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला आहे. पण, सुचित्रा यांचा हा मॉडर्न लूक पाहून त्यांचा लेक सोहम बांदेकरची काय प्रतिक्रिया होती? बाईपण भारी देवा चित्रपटातील त्यांचा लूक सोहमला कसा वाटला? हे लोकमत फिल्मीने जाणून घ्यायचा प्रयत्न केला. बाईपण भारी देवा चित्रपटातील आईच्या लूकबद्दल विचारलं असता सोहम म्हणाला, “या लूकबद्दल आई थोडी साशंक होती. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आईचा नवा लूक पाहिला. तेव्हा हा लूक कंटिन्यू कर, असं मी आईला म्हणालो होतो. तू तरुणच दिसत आहे. तुला मनातून वाटतंय, तू तरुण आहेस. त्यामुळे काहीच टेन्शन नाही, असंही मी तिला सांगितलं होतं.”

“योग्य वेळ आली की...”, रवींद्र महाजनी यांच्याबाबत गश्मीरने केलेली 'ती' पोस्ट मृण्मयीने केली शेअर, म्हणाली...

सोहमही एक उत्तम अभिनेता आहे. 'बाईपण बारी देवा' या चित्रपटातही तो झळकला होता. त्याने या चित्रपटात सुचित्रा यांच्या मुलाची भूमिका साकारली आहे. अभिनयाबरोबर सोहमने निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. सध्या तो ठरलं तर मग या मालिकेची निर्मिती करत आहे.

मणिपूरमधील महिला अत्याच्याराच्या व्हिडिओवर अक्षयची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाला, “गुन्हेगारांना...”

दरम्यान, ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुसाट आहे. या चित्रपटाने अवघ्या २० दिवसांत ५७ कोटींची कमाई केली आहे. नुकतीच या चित्रपटाची सक्सेस पार्टी पार पाडली. चित्रपटाला मिळणारं भरघोस यश पाहून कलाकारांसह दिग्दर्शक केदार शिंदेही भारावून गेले आहेत.

टॅग्स :मराठी चित्रपटमराठी अभिनेताआदेश बांदेकरकेदार शिंदे