Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बाहुबली-३' संदर्भात समोर आली खूषखबर, प्रभासच्या फॅन्ससाठी मोठी बातमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 13:48 IST

'बाहुबली' चित्रपटातून आपल्या अभिनयाची आणि गुड लुकिंग पर्सनॅलिटीची जादू पसरवणाऱ्या अभिनेता प्रभासची चाहत्यांमध्ये क्रेझ आहे. अशा परिस्थितीत त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

'बाहुबली' फेम अभिनेता प्रभासच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. 'बाहुबली' चित्रपटाचे दोन भाग आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत आणि दोन्ही भागांची बॉक्सऑफीसवर बक्कळ कमाई केली आहे. 'बाहुबली'ची क्रेझ पाहता आता चित्रपटाच्या तिसऱ्या भागाशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. 

अभिनेता प्रभासच्या बाहुबली या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड केले होते यात शंका नाही. हा चित्रपट आजही प्रेक्षकांची पहिली पसंती आहे. चित्रपटाचा दुसरा भाग पाहिल्यानंतर चाहते चित्रपटाचा तिसरा भाग पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. आता बाहुबली चित्रपटाच्या सिक्वेलबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, बाहुबलीचे निर्माते प्रसाद देविनेनी या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबद्दल म्हणाले, 'बाहुबली वर्ल्डमध्ये इतका वाव आहे की आणखी एक कथा नक्कीच सांगता येईल. कथेचं जग तेच राहील आणि त्यातील पात्रं लार्जर दॅन लाईफ आहेत'

'आम्ही ते लगेच सुरू करण्याचा विचार करत नाही कारण सध्या एसएस राजामौली यांच्याकडे काही चित्रपटांची जबाबदारी आहे. त्यानंतर आपण त्यावर विचार करू. साहजिकच आम्ही ते करू, पण जर गोष्टी व्यवस्थित झाल्या तरच ते शक्य होईल. सध्या याबाबत कोणतेही काम सुरू झालेले नाही', असंही प्रसाद देविनेनी म्हणाले. आरआरआर चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, एसएस राजामौली यांनी बाहुबली-3 बद्दल संकेत देखील दिले होते. आता बाहुबलीच्या निर्मात्याच्या वक्तव्यानंतर चित्रपटाचे निर्माते बाहुबली पार्ट 3 बद्दल खरोखरच विचार करत आहेत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

 

टॅग्स :बाहुबलीबॉलिवूड