Join us

बाहुबलीमधील या कलाकाराच्या पत्नीने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 15:21 IST

या अभिनेत्याने चित्रपटात काम करण्यासोबतच काही दाक्षिणात्य मालिकांमध्ये देखील काम केले आहे. 

ठळक मुद्देमधू प्रकाश त्याची पत्नी भारतीसोबत हैद्राबाद येथील पंचवटी कॉलनीमध्ये राहात होता. त्याच्या पत्नीने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. मधू आणि भारती यांचे लग्न 2015 मध्ये झाले होते.

बाहुबली या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. या चित्रपटाच्या कथेमुळे प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवले. या चित्रपटाचे दोन्ही भाग प्रचंड गाजले. या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांचे मन जिंकले. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेल्या कलाकारांइतकेच अगदी छोट्याशा व्यक्तिरेखेत असलेले कलाकार देखील आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. अभिनेता मधू प्रकाशने बाहुबली या चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारली होती. केवळ एका दृश्यात आपल्याला त्याला पाहायला मिळाले होते. त्याचे पत्नीचे आज हैद्राबादमध्ये निधन झाले.

मधू प्रकाश त्याची पत्नी भारतीसोबत हैद्राबाद येथील पंचवटी कॉलनीमध्ये राहात होता. त्याच्या पत्नीने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. मधू आणि भारती यांचे लग्न 2015 मध्ये झाले होते. मधू अभिनय करण्यासोबतच एका प्रायव्हेट कंपनीत काम करत होता तर त्याची पत्नी ही गृहिणी होते. मधू आणि त्याच्या पत्नीसोबतच त्याचे आई वडील देखील त्यांच्यासोबतच राहात होते. 

मधू आणि भारतीच्या नात्याबाबत हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मधू आणि भारतीच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, मधूच्या कामाबाबत भारती खूश नव्हती. मधू त्याच्या कामामुळे अनेक वेळा घरी खूपच उशिरा यायचा. त्यामुळे त्या दोघांमध्ये खूप भांडणं व्हायची. एवढेच नव्हे तर त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचा त्याच्या पत्नीला संशय होता. मंगळवारी सकाळी दहा वाजता मधूने त्याच्या पत्नीला सांगितले की, तो जिमला जात असून तिथूनच तो चित्रीकरणासाठी जाईल. भारतीला हे सांगून मधू निघून गेला. त्यानंतर काही तासांनी भारतीने मधूला फोन करून घरी परतायला सांगितले आणि तो परत आला नाही तर मी आत्महत्या करेन अशी धमकी देखील दिली. मधू ज्यावेळी घरी परतला, तेव्हा भारतीने गळफास घेत आत्महत्या केली होती. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, भारतीने आत्महत्या केली असून पोलिसांनी अपघाती मृत्यूची केस दाखल केली आहे. याबाबत सध्या पुढील तपास सुरू आहे. 

मधू प्रकाशने चित्रपटात काम करण्यासोबतच काही दाक्षिणात्य मालिकांमध्ये देखील काम केले आहे.  

टॅग्स :बाहुबली