Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बाहुबली 3' येणार? निर्माते म्हणाले, "काम सुरु आहे..."; प्रभास-राजामौलींची जादू पडद्यावर पुन्हा दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 11:41 IST

'बाहुबली' फ्रँचायजीचे निर्माते के ई ज्ञानवेल राजा यांनी नुकतीच तिसऱ्या भागाची हिंट दिली आहे.

'बाहुबली' (Baahubali) सिनेमा म्हटलं की एस एस राजामौली ( S S Rajamouli) भव्यदिव्य सेट आठवतो. प्रभास (Prabhas) या सिनेमामुळे जगभरात लोकप्रिय झाला. राजामौलींनी साऊथ सिनेमाला ग्लोबल स्तरावर ओळख मिळवून दिली. 'बाहुबली : द कन्क्लुजन; 'बाहुबली : द बिगिनींग' अशा दोन भागांमध्ये हा सिनेमा बनला. 'बाहुबली' ने बॉक्सऑफिसवरही एकापेक्षा एक रेकॉर्ड रचले. तर आता या सिनेमाच्या तिसऱ्या भागाचीही चर्चा सुरु आहे. 'बाहुबली' फ्रँचायजीचे निर्माते के ई ज्ञानवेल राजा यांनी नुकतीच तिसऱ्या भागाची हिंट दिली आहे. ज्ञानवेल सध्या 'कंगुआ' चं प्रमोशन करत आहेत. यावेळी एका मुलाखतीत ते म्हणाले, "बाहुबली ३ प्लॅनिंग स्टेजवर आहे. ही गोष्ट मला गेल्या आठवड्यातच राजामौली यांच्याशी चर्चा करताना समजली. त्यांनी बाहुबली १ आणि २ सोबतच बनवला होता. पण आता ते तिसऱ्या भागाचीही प्लॅनिंग करत आहेत. २०१७ मध्ये जेव्हा बाहुबली २ आला होता तेव्हाच तिसऱ्या भागासाठी राजामौली यांचे वडील आणि लेखक विजयेन्द्र प्रसाद यांनी बाहुबली ३ साठी नकार दिला होता. पण आता ते होताना दिसतंय."

ज्ञानवेल पुढे म्हणाले, "सिनेमा बनायला अजून बराच वेळ आहे. तसंही सध्या राजामौली SSMB29 मध्ये व्यस्त आहेत."  सध्या ज्ञानवेल यांचा 'कंगुआ' १४नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. सिनेमात बॉबी देओल आणि दिशा पटानी देखील आहेत. यानंतर 'कल्कि २' आणि 'सालार २' पाईपलाईन मध्ये आहेत. 

टॅग्स :बाहुबलीएस.एस. राजमौलीTollywoodप्रभास