बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि इरफान खान गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा सामना करत आहेत. आता बॉलिवूडला पुन्हा एक धक्का बसला आहे. होय, बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप हिलादेखील कॅन्सरचे निदान झाले. ताहिराला कॅन्सरचे निदान झाल्याची बातमी समोर येताच, बॉलिवूड पुन्हा एकदा हादरले.
ताहिराने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत आपल्या आजाराची माहिती दिली. स्टेज ० ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्याचे तिने या पोस्टमध्ये सांगितले आहे.
माझ्यासारख्या अनेक महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरविषयी जागृती निर्माण करण्यासाठी मी ही पोस्ट लिहिली असल्याचे ताहिराने म्हटले आहे. ‘किम कर्दाशियनला टक्कर देण्याची संधी माझ्या हातून निसटली. मला एक पुरस्कार मिळणार असल्याचे मी एक आठवड्यांपूर्वी सांगितले होते. मी तेव्हीही खूश होत, आत्ताही आनंदी आहे. याचमुळे मी ही पोस्ट लिहिले आते. मी स्वत:वर प्रेम करते आणि परमेश्वराचे आभार मानू इच्छिते. माझ्या या पोस्टसोबतचा फोटो तुम्हाला विचलित करू शकतो. पण एका व्याथीने मला जडले आहे. मला झीरो स्टेज ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. सर्व वयाच्या मुलींना ब्रेस्ट कॅन्सरबद्दल कळावे, असे मला वाटते,’ असे ताहिराने लिहिले आहे.
आयुष्यमानने २०११ मध्ये ताहिरा कश्यपसोबत लग्न केले. त्याआधी ११ वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होत़े. ताहिरा १६ वर्षांची होती, तेव्हा दोघांची भेट झाली होती. ताहिराच्या वडिलांना आयुष्यमान खूप आवडायचा. हा मुलगा तुला खूप आनंदी ठेवेन, असे ते आपल्या मुलीला म्हणाले होते. या कपलला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत.