बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराणा याची पत्नी ताहिरा कश्यप सध्या कॅन्सरशी झुंज देतेय. अलीकडे कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर ताहिरा कामावर परतली होती. पण आता तिचा कॅन्सर पुन्हा परतला आहे. होय, ताहिराचा ब्रेस्ट कॅन्सर 1st A स्टेजवर पोहोचला आहे. आधी तो 0 स्टेजवर होता. साध्या सोप्या शब्दात सांगायचे तर ताहिराला दुस-यांदा कॅन्सर डिटेक्ट झाला आहे.
स्वत: ताहिराने इन्स्टाग्रामवर ही माहिती दिली आहे. ‘कॅन्सरबद्दल कळल्यावर तुम्ही त्याला बाहेरचा रस्ता दाखवता. पण हे अत्यंत कठीण आहे. अनेकदा आपल्याला आपल्या आतील शक्तीचा अंदाज येत नाही. माझ्या मते, आयुष्यात अनेक अडचणी येतात आणि या अडचणीचं तुम्हाला आणखी सहनशील, शक्तीशाली बनवतात. मला स्टेज 1st A कॅन्सरचे निदान झाले आहे आणि यासाठी मला १२ किमोथेरपी घ्यावा लागणार आहेत. यापैकी सहा मी घेतल्या. आणखी सहा बाकी आहेत. कॅन्सरशी झुंज देण्याच्या आत्तापर्यंतच्या माझ्या प्रवासाला मी ही माझी पोस्ट समर्पित करते. अर्धा प्रवास संपला...अर्धा बाकी आहे...’ असे ताहिराने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. शिवाय या प्रवासात आधार देणा-या, मनोबल उंचावणा-यांचे तिने आभार मानले आहेत.
आयुष्यमानने २०११ मध्ये ताहिरा कश्यपसोबत लग्न केले. त्याआधी ११ वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होत़े. ताहिरा १६ वर्षांची होती, तेव्हा दोघांची भेट झाली होती. ताहिराच्या वडिलांना आयुष्यमान खूप आवडायचा. हा मुलगा तुला खूप आनंदी ठेवेन, असे ते आपल्या मुलीला म्हणाले होते. या कपलला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत.
आयुष्मान एक चांगला गायक आणि गीतकारही आहे. ह्यविकी डोनरह्णमधील पानी दा रंग हे गाणे आयुष्यमानने स्वत: लिहिले होते, शिवाय स्वत:च ते गायले होते.