बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचे लग्न निपटले. आता दीपिका आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये परतण्यास तयार आहे. लग्नानंतरचा दीपिकाचा पहिला अॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी हिच्या आयुष्यावर बेतलेला आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात दीपिका एका दमदार व आव्हानात्मक भूमिकेत दिसेल. सूत्रांचे मानाल तर लवकरच या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. पण त्याआधी निर्मात्यांना एका वेगळ्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे. होय, डीएनएच्या वृत्तानुसार, या चित्रपटात मेकर्सला दीपिकाच्या तोडीचा दमदार अॅक्टर हवा आहे. मेर्कर्सच्या डोक्यात या भूमिकेसाठी दोन नावे आहेत. एक म्हणजे, राजकुमार राव आणि दुसरे म्हणजे आयुष्यमान खुराणा. दोघेही एकमेकांपेक्षा तसूभरही कमी नाहीत. त्यामुळे या दोघांपैकी कुणाला साईन करावे, असा प्रश्न मेकर्सला पडला आहे.
कोण बनणार दीपिका पादुकोणचा ‘हिरो’?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 16:07 IST
मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात दीपिका एका दमदार व आव्हानात्मक भूमिकेत दिसेल. सूत्रांचे मानाल तर लवकरच या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. पण त्याआधी निर्मात्यांना एका वेगळ्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे.
कोण बनणार दीपिका पादुकोणचा ‘हिरो’?
ठळक मुद्दे२०१८ हे वर्ष आयुष्यमान आणि राजकुमार दोघांसाठीही शानदार राहिले. यावर्षी आयुष्यमानने ‘अंधाधून’ व ‘बधाई हो’ सारखे सुपरहिट चित्रपट दिलेत. तर राजकुमार रावचा ‘स्त्री’ हा चित्रपटही ब्लॉकबस्टर ठरला.