Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रेक्षकांचा लाडका अभिजित परततोय

By admin | Updated: August 4, 2016 02:00 IST

‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेमुळे अभिनेता अभिजित खांडकेकर प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला होता

‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेमुळे अभिनेता अभिजित खांडकेकर प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला होता. या मालिकेनंतर जवळजवळ तीन-चार वर्षं तो छोट्या पडद्यापासून दूर राहिला. दरम्यान, त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. आता पुन्हा एकदा अभिजित मालिकेत झळकणार आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत अभिजित प्रमुख भूमिकेत असल्याचे कळतेय. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेत अभिजित रोमँटिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. पण आता या मालिकेत तो एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. अभिजितला त्याच्या या नव्या मालिकेबद्दल विचारले असता त्याने काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. अभिजितने नकार दिला असला तरी या बातमीमुळे त्याचे फॅन्स नक्कीच खूश झाले असतील.