Join us  

'मी फार दिवस जगणार नाही'; कॅन्सरची ट्रिटमेंट घेतांना अतुल परचुरेंवर झाले होते चुकीचे उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 12:06 PM

Atul parchure: उपचार सुरु असताना अतुल परचुरे यांच्यावर विपरीत परिणाम होऊ लागला होता.

मराठी सिनेविश्वातील नावाजलेलं नाव म्हणजे अतुल परचुरे (atul parchure). बालकलाकार म्हणून अभिनयाची कारकिर्द सुरु करणाऱ्या या अभिनेत्याने मराठी सिनेसृष्टी गाजवून सोडली. नाटक, सिनेमा, मालिका अशा विविधांगी माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. परंतु, मध्यंतरी सारं काही सुरळीत सुरु असताना त्यांना कर्करोगासारख्या असाध्य आजाराला सामोरं जावं लागलं. त्यामुळे हा मधला काळ त्यांच्यासाठी प्रचंड जोखमीचा आणि कठीण होता.डॉक्टरांनी दिलेल्या चुकीच्या सल्ल्यामुळे त्यांचा कर्करोग आणखीनच बळावला होता. एका मुलाखतीमध्ये त्यांनी कर्करोग होण्यापासून ते कर्करोगावर मात करेपर्यंतच्या प्रवासाविषयी भाष्य केलं.

आज अतुल परचुरे यांचा ५७ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या आहेत. यात त्यांची मुलाखत जास्त चर्चेत आली आहे.

"माझ्या लग्नाला २५ वर्ष झाली. मी एकदम फिट होतो आणि त्यामुळेच ऑस्ट्रेलिया-न्युझिलंडला फिरायला गेलो होतो. पण, तिकडून आल्यानंतर काही दिवसांनंतर मला काही खाण्याची इच्छाच होईना. सतत मळमळल्यासारखं व्हायचं. काहीतरी गडबड झाली होती. त्यावर माझ्या भावाने मला काही औषधं सुद्धा दिली. पण, त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यानंतर डॉक्टरांनी मला अल्ट्रासोनोग्राफी करायला सांगितली. त्यावेळी डॉक्टरांच्या डोळ्यात मला भिती दिसत होती. मला तेव्हाच कळलं काहीतरी गडबड आहे. त्यानंतर माझ्या यकृतामध्ये ५ सेंटीमीटर लांबीची कर्करोगाची गाठ असल्याचं मला सांगण्यात आलं. त्यावर फक्त मी ठीक होणार की नाही हा एकच प्रश्न विचारला. डॉक्टरांनी हो. तू ठीक होशील असं उत्तर दिलं", असं अतुल परचुरे म्हणाले.

पुढे ते सांगतात, "उपचार सुरु झाले पण त्याचा माझ्यावर विपरीत परिणाम झाला. चुकीचा आजार जडल्याने माझी प्रकृती आणखीनच खालावली. सुरुवातीलाच हा आजार न दिसल्यामुळे माझ्या स्वादुपिंडावर परिणाम झाला. चुकीच्या उपचारांमुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली. मला नीट चालताही येत नव्हतं. मी बोलत असताना स्तब्ध व्हायचो.या अशा परिस्थिती डॉक्टरांनी मला दीड महिना वाट पाहायला सांगितली. त्यांनी सांगितलं जर सर्जरी केली तर वर्षानुवर्ष कावीळ होईल आणि माझ्या यकृतामध्ये पाणी भरेल किंवा मी फार दिवस जगणार नाही. त्यानंतर मी डॉक्टर बदलले आणि योग्य उपचार केले."

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच अतुल परचुरे यांनी पुन्हा एकदा रंगमंचावर दमदार कमबॅक केलं. 'खरं खरं सांग' या नाटकात ते झळकले. इतकंच नाही तर या नाटकाच्या निमित्ताने त्यांनी विदेशदौरादेखील केला.

टॅग्स :अतुल परचुरेसेलिब्रिटीमराठी अभिनेतासिनेमाकर्करोग