Join us
Daily Top 2Weekly Top 5

पक्का तेरी शर्ट है...! अथियाचा फोटो पाहून नेटकरी सैराट, अशी घेतली के.एल. राहुलची मजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 14:24 IST

राहुलची कमेंट पाहताच नेटकरीही झालेत अ‍ॅक्टिव्ह...

ठळक मुद्देअद्याप अथिया किंवा राहुल यापैकी कोणीच त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे बोललेले नाही. पण हे नाते त्यांनी याला नाकारलेही नाही.

सुनील शेट्टी यांची लाडकी लेक अथिया शेट्टी हिने ‘हिरो’या चित्रपटातून डेब्यू केला. पण हा चित्रपट दणकून आपटला. अनीस अज्मीच्या ‘मुबारकां’मध्ये अथियाला दुसरी संधी मिळाली. पण हा चित्रपटही फ्लॉप ठरला. ‘मोतीचूर चकनाचूर’ हा तिचा तिसरा सिनेमाही सुपरडुपर फ्लॉप झाला. तिसरा चित्रपटही फ्लॉप ठरल्यानंतर अथियाच्या करिअरची नौका बुडताना दिसतेय. पण दुसरीकडे अथियाच्या लव्ह लाईफची चर्चा जोरात आहे. होय, अथिया क्रिकेटपटू केएल राहुलला डेट करत असल्याची सध्या चर्चा आहे. अद्याप दोघांनी याची कबुली दिली नाही. पण हो दोघांचे फोटो मात्र बरेच काही सांगताहेत. नुकताच अथियाने एक फोटो शेअर केला आणि हा फोटो पाहताच नेटक-यांच्या कमेंटचा पूर आला. खुद्द के़एल़ राहुलनेही या फोटोवर कमेंट केली.

 होय, अथियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने एक ओव्हरसाइज व्हाईट शर्ट घातला आहे. या फोटोला तिने ‘पार्टी ऑफ टू’ असे कॅप्शन दिले आहे. 

अथियाचा हा फोटो पाहून के. एल. राहुलने स्वत:ला रोखू शकला नाही. मग काय, ‘अच्छी शर्ट है’ अशी कमेंट त्याने केली. राहुलची कमेंट पाहताच नेटकरीही अ‍ॅक्टिव्ह झालेत. यानंतर अनेकांनी अथियाच्या या शर्टवरून राहुलची मजा घ्यायला सुरुवात केली.

‘भाई आपकी शर्ट है क्या,’ असा सवाल एका चाहत्याने राहुलला केला. तर एकाने ‘भाई पक्की आपकी ही शर्ट है,’ असे म्हणत, राहुलची मजा घेतली.

 अद्याप अथिया किंवा राहुल यापैकी कोणीच त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे बोललेले नाही. पण हे नाते त्यांनी याला नाकारलेही नाही. काही दिवसांपूर्वी एका पाटीर्नंतरचे या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यापश्चात खुद्द राहुलनेच अथियासोबतचा एक फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोनंतर हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा  नव्याने सुरू झाल्या होत्या.

टॅग्स :अथिया शेट्टी लोकेश राहुल