Join us
Daily Top 2Weekly Top 5

अथिया शेट्टीने शेअर केला ग्लॅमरस फोटो, कथित बॉयफ्रेंड आणि क्रिकेटर केएल राहुलने केलं रिअ‍ॅक्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 19:30 IST

बर्‍याचदा अथिया राहुलबरोबरचे फोटो शेअर करत असते.

सुनील शेट्टीची मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी तिच्या फोटोंना घेऊन नेहमी चर्चेत असते. ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. तिच्या फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. अथिया शेट्टी तिचा कथित बॉयफ्रेंड केएल राहुलला घेऊनसुद्धा चर्चेत असते. ती बर्‍याचदा राहुलबरोबरचे आपले फोटो शेअर करताना दिसली आहे. अलीकडेच आथियाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केले आहे, त्यावर तिच्या कथित बॉयफ्रेंडने कमेंट केली आहे. 

अथियाने स्वत: चे एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. फोटोत अथियाने थाई स्लिट ड्रेस परिधान केला होता जो सध्या ट्रेंडमध्ये आहे. तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्स येतायेत. आथियाच्या या फोटोवर चाहत्यांसोबत सेलिब्रेटींनीही कमेंट्स केल्या आहेत. डायना पेंटी, कतरिना कैफची बहीण इसाबेल आणि टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफने देखील कमेंट केली आहे. मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते केएल राहुलच्या कमेंटने. राहुलने अथियाच्या फोटोवर इमोज शेअर केली आहे. ज्यावरुन राहुलला आथियाचा हा फोटो आवडल्याच अंदाज येतो आहे. 

अथिया शेट्टीच्या करिअरबाबत बोलायचे झाले तर  2015 मध्ये 'हिरो' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली होती. यात अथियाच्या अपोझिट सूूरज पंचोली होतो. यानंतर अथिया   नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत 'मोतीचूर चकनाचूर' सिनेमात दिसली. या सिनेमातील त्याच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली पण तरीही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.

टॅग्स :अथिया शेट्टी लोकेश राहुल