Join us
Daily Top 2Weekly Top 5

अथिया शेट्टीने फोटोतून केएल राहुलला केले ‘बाद’; चाहते म्हणाले, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 12:57 IST

अथिया व केएल राहुल यांच्यात बिनसल्याची चर्चा...

ठळक मुद्देअथिया शेट्टी हिने ‘हिरो’या चित्रपटातून डेब्यू केला. पण हा चित्रपट दणकून आपटला.

सुनील शेट्टीची लाडकी लेक अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल यांच्या अफेअरची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. खरे तर अथिया व केएल यांपैकी कुणीही अधिकृतपणे या नात्याची कबुली दिली नाही. पण डेटींगच्या चर्चेला हवा देण्याचे काम मात्र त्यांनी न चुकता केले. दोघांचे एकत्र फोटो, एकत्र बाहेर फिरणे, एक दुस-यांचे फोटो शेअर करणे आणि त्यावर क्यूट कमेंट करणे यामुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. पण याचदरम्यान असे काही झाले की, अचानक या दोघांच्या ब्रेकअपची चर्चा सुरु झाली.होय, अथियाने नुकताच तिच्या सोशल अकाऊंटवर एक थ्रोबॅक फोटो शेअर केला. चाहत्यांची नजर या फोटोवर गेली आणि अथिया व केएल राहुल यांच्यात बिनसल्याची नवी चर्चा सुरु झाली. आता अथियाने शेअर केलेल्या फोटोत असे काय आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण या फोटोत काय नाही, असा प्रश्न विचारा. 

होय, अथियाने शेअर केलेल्या या फोटोत केएल राहुल नाहीये. दिसतोय तो केवळ त्याचा हात. या जुन्या फोटोत अथिया व राहुल एकत्र होते. पण आता अथियाने यातून राहुलला क्रॉप करत केवळ स्वत:चा तेवढा फोटो शेअर केला. ‘जणू एक स्वप्न भासतेय,’ असे कॅप्शन तिने हा फोटो शेअर करताना दिले.

आधी केएल राहुलचा चेहरा क्रॉप करणे आणि त्यानंतर हे कॅप्शन पाहून चाहत्यांना अनेक प्रश्न पडले नसतील तर नवल. अथिया व केएल राहुल यांच्या बिनसले तर नाही ना? असा प्रश्न मग चाहते विचारू लागलेत.

काही दिवसांपूर्वी अथियाने केएल राहुलच्या वाढदिवशी त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता. हॅपी बर्थ डे माय पर्सन, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले होते. पण अचानक असे काय झाले की, फोटोतून केएल राहुलला तिने बाद केले, हा प्रश्न सध्या चाहत्यांना पडला आहे. येत्या दिवसांत याचेही उत्तर मिळेल, अशी आशा करूया. अथिया शेट्टी हिने ‘हिरो’या चित्रपटातून डेब्यू केला. पण हा चित्रपट दणकून आपटला. अनीस अज्मीच्या ‘मुबारकां’मध्ये अथियाला दुसरी संधी मिळाली. पण हा चित्रपटही फ्लॉप ठरला. ‘मोतीचूर चकनाचूर’ हा तिचा तिसरा सिनेमाही सुपरडुपर फ्लॉप झाला. तिसरा चित्रपटही फ्लॉप ठरल्यानंतर अथियाच्या करिअरची नौका बुडताना दिसतेय. पण दुसरीकडे अथियाच्या लव्ह लाईफची चर्चा जोरात आहे. 

 

टॅग्स :अथिया शेट्टी लोकेश राहुल