Join us
Daily Top 2Weekly Top 5

 टीम इंडियाच्या ‘या’ क्रिकेटपटूने अथिया शेट्टीला दिल्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा, सुरु झाल्या अफेअरच्या चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 10:18 IST

सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी तिच्या पर्सनल लाईफबद्दल खूप अधिक सजग आहे. कदाचित म्हणूनच तिच्या अफेअरच्या चर्चा फार कमी ऐकायला मिळतात. पण गेल्या काही दिवसांपासून अथियाच्या अफेअरच्या चर्चा जोरात आहेत.

ठळक मुद्देअथियाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास लवकरच ती नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अपोझिट ‘मोतीचूर चकनाचूर’ या सिनेमात दिसणार आहे.

सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी तिच्या पर्सनल लाईफबद्दल खूप अधिक सजग आहे. कदाचित म्हणूनच तिच्या अफेअरच्या चर्चा फार कमी ऐकायला मिळतात. पण गेल्या काही दिवसांपासून अथियाच्या अफेअरच्या चर्चा जोरात आहेत. गेल्या काही दिवसांपासून तिचे नाव क्रिकेटपटू केएल राहुलसोबत जोडले जात आहे. आत्तापर्यंत या दोघांनी आपले नाते जगापासून लपवून ठेवले. पण आता कदाचित राहुलने हे नाते जगजाहिर केले आहे. काल अथियाचा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसानिमित्त बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी अथियाला शुभेच्छा दिल्या. पण सर्वाधिक लक्षवेधी ठरल्या त्या केएल राहुलच्या शुभेच्छा.

होय, केएल राहुलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अथियासोबतचा एक फोटो शेअर करत, हॅपी बर्थडे असे लिहिले. यासोबत त्याने मंकी इमोजी पोस्ट केला. फोटोत केएल राहुलची नजर अथियावर खिळलेली आहे. तर अथियाच्या चेह-यावर खट्याळ हसू आहे. या फोटोवरून केएल राहुल व अथिया रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

महिनाभरापूर्वी अथिया व केएल राहुल दोघेही डिनर डेटवर गेले होते. यादरम्यानचे दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. चर्चा खरी मानाल तर, केएल राहुल याआधी कुठल्याही बॉलिवूड अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये नव्हता. पण अथियाच्या प्रेमात मात्र तो आकंठ बुडालाय. यावर्षी फेबु्रवारीत दोघांनी डेटींग करणे सुरु केले आणि आता हा मामला बराच पुढे गेला आहे.

राहुल व अथियाची भेट एका कॉमन फ्रेन्डद्वारे झाली. ही फ्रेन्ड म्हणजे आकांक्षा रंजन. गत एप्रिल महिन्यात आकांक्षाने आपल्या अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोतही अथिया व केएल राहुल सोबत दिसले होते.अथियाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास लवकरच ती नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अपोझिट ‘मोतीचूर चकनाचूर’ या सिनेमात दिसणार आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.

टॅग्स :अथिया शेट्टी लोकेश राहुल