Join us
Daily Top 2Weekly Top 5

असिनचे आगळेवेगळे सेलीब्रेशन!

By admin | Updated: March 21, 2016 01:48 IST

‘गजनी’फेम असीन आणि मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्मा हे १९ जानेवारी रोजी विवाहबंधनात अडकले होते. काल त्यांच्या लग्नाला दोन महिने पूर्ण झाले.

‘गजनी’फेम असीन आणि मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्मा हे १९ जानेवारी रोजी विवाहबंधनात अडकले होते. काल त्यांच्या लग्नाला दोन महिने पूर्ण झाले. हा क्षण एन्जॉय करण्यासाठी असीन आणि राहुलने घरच्या घरी अतिशय उत्तम सेलीब्रेशन केले. तसेच तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो कोलाजही पोस्ट केले आहे. त्यांच्या लग्नाचे काही फोटो तिने पोस्ट केले आहेत. फेब्रुवारी महिन्यात जेव्हा त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला होता, तेव्हा तिने राहुलच्या इन्स्टाग्रामवर असाच एक फोटो पोस्ट करून मेसेज पाठवला होता. किती छान! ते त्यांच्या लग्नाचा वाढदिवस दरमहिन्याला सेलीब्रेट करीत आहेत. या दोघांनी दरमहिन्याला जर त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला तर वर्षाच्या शेवटी या वाढदिवसाचे ग्रँड सेलीब्रेशन त्यांना करावे लागेल.