Join us
Daily Top 2Weekly Top 5

अशोक सराफ-निवेदिता क्युटेस्ट कपल

By admin | Updated: March 4, 2016 01:13 IST

मराठी इंडस्ट्रीतील एव्हरग्रीन जोडी म्हणजे अशोक सराफ आणि निवेदिता जोशी. या दोघांनीही ‘एक से बढकर एक’ असे अनेक चित्रपट देऊन त्यांच्या पडद्यावरील केमिस्ट्रीने प्रेक्षकांना भुरळ पाडली

मराठी इंडस्ट्रीतील एव्हरग्रीन जोडी म्हणजे अशोक सराफ आणि निवेदिता जोशी. या दोघांनीही ‘एक से बढकर एक’ असे अनेक चित्रपट देऊन त्यांच्या पडद्यावरील केमिस्ट्रीने प्रेक्षकांना भुरळ पाडली, यात शंका नाही. या जोडीचे अनेक चाहते आहेतच, परंतु यामध्ये कलाकारांचादेखील समावेश आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी या जोडीचे फॅन आहेत. मग अशातच सगळ्यांची लाडकी अभिनेत्री पूजा सावंत कशी मागे राहणार. पूजाला यांची जोडी फार आवडते, असे आम्ही नाही, तर तीच सांगतीय. एवढेच नाही, तर या सदाबहार जोडीला ती क्युटेस्ट कपल इन धिस वर्ल्ड, असे म्हणतेय. आपल्या या फेव्हरेट जोडीसोबत एक फोटो क्लिक करण्याचा मोह पूजाला आवरता आला नाही. तिने या कपलसोबत मस्त फोटो काढून तो सोशल साइटवर अपलोड केला आहे.