Join us  

याला म्हणतात संस्कार! अशोक मामांना पाहताच भाऊ कदम त्यांच्या पाया पडला, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2023 2:48 PM

अशोक मामांना एकदा तरी भेटावं आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. भाऊची हिच इच्छा पूर्ण झाली

अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. मराठी सिनेसृष्टीत मोलाचं योगदान देणाऱ्यांपैकी ते एक अभिनेते आहेत. विनोदाच्या अचूक टायमिंगने त्यांनी नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवलं. त्यांच्या कामासोबतच ते त्यांच्या प्रेमळ स्वभावासाठीही ओळखले जातात. सर्वजण त्यांना अशोक मामा अशी हाक मारतात. सध्या त्यांचा आणि भाऊ कदमचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

'चला हवा येऊ द्या' म्हणत त्याने आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. भाऊ कदमचं नाव आज प्रसिद्ध विनोदवीरांमध्ये घेतलं जातं. मात्र, विनोदवीर असण्यासोबतच तो तितकाच उत्तम अभिनेतादेखील आहे. आजवर त्याने अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. भाऊने अशोक मामांची भेट घेतली आहे. 

अशोक मामांना एकदा तरी भेटावं आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. भाऊची हिच इच्छा पूर्ण झाली. ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर अशोक मामा आले असताना भाऊ व त्यांची भेट झाली. या भेटीदरम्यानचा व्हिडीओ भाऊने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. 

  या व्हिडीओमध्ये भाऊ अशोक मामांना भेटायला गेलेला दिसत आहे. अशोक मामांना पाहताच भाऊ त्यांच्या पाया पडला.  अशोक मामांनी देखील भाऊची विचारपूस केली. अशोक मामांना भेटल्याचा आनंद भाऊच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतोय. कॉमेडी चे दोन बादशाह आज एकत्र, एक नंबर, दोन हास्य सम्राट एका फ्रेममध्ये, मस्त अशा कमेंट्स चाहत्यांनी या व्हिडीओवर केली आहे. 

टॅग्स :अशोक सराफभाऊ कदम