आर्यन खानची 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' ही वेबसीरिज नुकतीच रिलीज झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या वेबसीरिजची चर्चा होती. बॉलिवूडचे तीनही खान या वेबसीरिजच्या निमित्ताने एकत्र दिसणार आहेत. इतकंच नव्हे प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटींचा या वेबसीरिजमध्ये कॅमिओ आहे. अशातच 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानने अधिकारी समीर वानखेडेंची चांगलीच खिल्ली उडवली असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. जाणून घ्याआर्यन खानने केली समीर वानखेडेंची मस्करी?
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या पहिल्याच एपिसोडमध्ये आर्यन खानने समीर वानखेडेंची चांगलीच मस्करी केल्याचं दिसतंय. या एपिसोडमध्ये असं दिसतं की, बॉलिवूडची पार्टी सुरु असते. इतक्यात पोलिसांची एक गाडी दिसते. ड्रग्जविरोधी मोहिम करणारे अधिकारी या गाडीत बसलेले असतात. या गाडीतून एक अधिकारी उतरतात. त्यांना दिसतं की एक तरुण मुलगा नशा करतोय. ते त्याच्याजवळ जातात. तो मुलगा त्यांना सांगतो. मी बॉलिवूड सेलिब्रिटी नाही, तो तिथे उभा आहे तो सेलिब्रिटी आहे. असं म्हणत तो मुलगा दुसऱ्या माणसाकडे बोट दाखवतो.