Join us

"नाव बदलू शकतो पण अस्तित्व...", प्रतीक बब्बरच्या 'त्या' निर्णयावर भावाने व्यक्त केली नाराजी, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 18:14 IST

बॉलिवूड अभिनेत्री स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर  (Pratik सातत्याने चर्चेत येत आहे.

Prateik Babbar: बॉलिवूड अभिनेत्री स्मिता पाटील (Smita patil) आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर  (Prateik babbar) सातत्याने चर्चेत येत आहे. अलिकडेच प्रतीकने त्याची गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीसोबत लग्नगाठ बांधली.  त्यादरम्यान, अभिनेत्याने आपल्या लग्नाला वडील राज बब्बर यांच्यासह कुटुंबीयांना आमंत्रण दिलं नाही अशी माहिती देखील समोर आली होती. हे प्रकरण चर्चेत असतानाच अचानक प्रतीकने त्याचं बब्बर हे आडनाव हटवण्याच्या निर्णय घेतला. आता या सगळ्या प्रकरणावर प्रतीक बब्बरचा सावत्र भाऊ आर्य बब्बरने आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

'हिंदुस्थान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आर्य बब्बरने अनेक खुलासे केले. त्यादरम्यान आर्य म्हणाला, "मला फक्त इतकंच सांगायचं आहे की स्मिता पाटील माझी देखील आई आहे. त्याला आपल्या नावासोबत कोणाचं नाव लावायचं आहे, हा त्याचा प्रश्न आहे. मी जर उद्या माझ्या नावात बदल करून आर्य बब्बरचं आर्य केलं किंवा राजेश केलं तरी मी तेव्हा देखील बब्बर कुटुंबाचा भाग असणार आहे."

पुढे आर्य भाऊ प्रतीक बब्बरच्या निर्णयावर म्हणाला, "आपण आपलं नाव बदलू शकतो पण अस्तित्व नाही. मी कायम बब्बर म्हणूनच वावरणार आहे. कारण माझं अस्तित्व त्या नावापासून सुरु होतं. मग तुम्ही ते नाव बदलण्याचा निर्णय कसा घेऊ शकता?" अशी प्रतिक्रिया देत आर्यने नाराजी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून स्मिता पाटीलचा लेक प्रतीकचे त्याच्या कुटुंबियांसोबत चांगले संबंध नाहीत. प्रतीकने त्याच्या कुटुंबियांना दूर केलंय, त्यामुळे सर्वांनाच या गोष्टीचा खूप त्रास होतोय, असा खुलासा आर्य बब्बरने केला होता. 

टॅग्स :प्रतीक बब्बरराज बब्बरस्मिता पाटीलबॉलिवूडसेलिब्रिटी