Join us

Arijit Singh: “भगवा रंग हा…” ‘गेरुआ’ कॉन्ट्रोव्हर्सीवर अरिजीत सिंग स्पष्टच बोलला...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 17:47 IST

Arijit Singh: बॉलिवूडमधील आघाडीचा गायक अरिजीत सिंगचे जगभर चाहते आहेत. हाच अरिजीत सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

अरिजीत सिंगचे (Arijit Singh) जगभर चाहते आहेत. हाच अरिजीत सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महिनाभरापूर्वी अरिजीतचा कोलकात्यातील एक लाईव्ह कॉन्सर्ट ऐनवेळी रद्द झाला होता. शाहरूख खानच्या चित्रपटाचं रंग दे तू मोहे गेरूआ या गाण्यामुळे अरिजीतचा कॉन्सर्ट रद्द करण्यात आल्याचं त्यावेळी मानलं गेलं होतं. गाण्यातील गेरुआ या शब्दावरुन भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जुंपली होती. आता या वादावर अरिजीतने प्रतिक्रिया दिली आहे.रंगावरून झालेल्या वादावर प्रतिक्रिया विचारली असता तो म्हणाला, “एका रंगावरून इतका वाद! भगवा रंग हा संन्याशी लोकांचा आहे, स्वामीजींचा ( विवेकानंद) आहे. त्यांनी जर पांढरा रंग परिधान केला असता तर त्यावरूनदेखील वाद झाला असता का?  

काय होता वादडिसेंबर २०२२ मध्ये आयोजित कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये अरिजीतने गेरूआ हे गाणं गायलं होतं. या कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही हजर होत्या.  यानंतर अचानक अरिजीतचा कोलकात्यातील नियोजित कॉन्सर्ट रद्द करण्यात आला होता. राजकीय कारणांमुळे आणि हस्तक्षेपामुळे हा कॉन्सर्ट रद्द करण्यात आल्याचं बोललं गेलं होतं. गेरूआ या शब्दामुळे जाणीवपूर्वक अरिजीतचा कॉन्सर्ट रद्द करण्यात आल्याचा आरोप भाजपाने केला होता. त्यावेळी पठाण या चित्रपटाच्या बेशरम रंग या गाण्याचा वादही पेटलेला होता. 

टॅग्स :अरिजीत सिंहपश्चिम बंगाल