Join us

जॉर्जिया एंड्रियानी लवकरच करणार बी-टाऊनमध्ये डेब्यू, या खानसोबत आहे रिलेशनशीपमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 14:57 IST

आहे. याआधी जॉर्जिया सलमान खानच्या 'दबंग 3'मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची चर्चा होती मात्र...

इटालियन मॉडेल, नर्तिका असलेली जॉर्जिया एंड्रियानी लवकरच बी-टाऊनमध्ये एंट्री करणार आहे. याआधी जॉर्जिया सलमान खानच्या 'दबंग 3'मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची चर्चा होती मात्र नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, जॉर्जिया सलमान खानच्या सिनेमातून नाही तर श्रेयस तळपडेच्या सिनेमातून पदार्पण करतेय. रिपोर्टनुसार श्रेयस आणि जॉर्जिया 'वेलकम टू बजरंगपूर' सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. या सिनेमाबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. या सिनेमात संजय मिश्रा, शरद सक्सेना आणि तिग्मांशु धूलिया सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.  

यात जॉर्जिया एका अशा महिलीची भूमिका साकारणार आहे जी परदेशातून गावात येते. जिथे त्याची ओळख श्रेयस तळपदेसोबत होते. हा सिनेमा 'वेलकम टू सज्जनपूर' सिनेमाचा फ्रेंजाईज आहे. ज्यात श्रेयस आणि अमृता राव मुख्य भूमिकेत होते.    

मलायकाशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खान इटालियन मॉडल जॉर्जियाला डेट करतोय आहे. दोघांना अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी आणि पार्टीमध्ये पाहिले जाते. जॉर्जियाचे नाव फॅशन जगतात खूप मोठे नाव आहे. तिने ३०हून अधिक फॅशन शो केले आहेत आणि सर्वोत्कृष्ट फॅशन आयकॉनमध्ये तिचे नाव आहे. आता ती तमीळ वेबसीरिजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करते आहे. या वेबसीरिजचे नाव आहे करोलिन कामाक्षी. या सीरिजमध्ये करोलिनची मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. 

टॅग्स :अरबाज खानदबंग 3