Join us
Daily Top 2Weekly Top 5

आपली ट्विन्स पाहून अनुष्का शर्माला बसला आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 13:51 IST

तुम्ही ऐकलंच असेल की जगात एकसारखे दिसणारे सात लोक असतात. अनेक वेळा हा प्रत्ययही खूप जणांना येतो. या गोष्टीचा प्रत्यय आता अभिनेत्री अनुष्का शर्माला देखील आला आहे.

ठळक मुद्देनुष्का कदाचित आपण ट्विन्स आहोत - जुलिया माइकल्स

तुम्ही ऐकलंच असेल की जगात एकसारखे दिसणारे सात लोक असतात. अनेक वेळा हा प्रत्ययही खूप जणांना येतो. या गोष्टीचा प्रत्यय आता अभिनेत्री अनुष्का शर्माला देखील आला आहे. काही दिवसांपूर्वी अनुष्कासारखी हुबेहूब दिसणाऱ्या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ही व्यक्ती म्हणजे अमेरिकन सिंगर जुलिया माइकल्स. तिचे फोटो पाहून अनुष्काची ट्विन्स असल्याचे बोलले जात होते.

आता तर खुद्द जुलियाने स्वतःचा आणि अनुष्काचा फोटो शेअर करत मस्करीत लिहिले की, अनुष्का कदाचित आपण ट्विन्स आहोत. अनुष्कादेखील तिचा फोटो पाहिल्यानंतर आश्चर्यचकीत झाली.

 

जुलियाचे ट्विट रिट्विट करत अनुष्का शर्माने ही गोष्ट मजेत घेतली. तिने लिहिले की,' OMG! मी माझ्या पूर्ण आयुष्यात तुला आणि बाकीच्या पाच हुबेहूब व्यक्तींना शोधत राहिले.' या अनुष्काच्या ट्विटवर मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.

 

अनुष्काप्रमाणे दिसणारी ही तरुणी अमेरिकन नागरिक असून जुलिया मायकल्स असे तिचे नाव आहे. जुलिया एक लेखिका असून ती गायिकाही आहे. ज्युलियाने २०१७मध्ये संगीतक्षेत्रात पदार्पण केले आहे. याच वर्षी तिचा 'इशूज' हे सोलो अल्बम प्रदर्शित झाला आहे.

टॅग्स :अनुष्का शर्मा