Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘या’ एका भीतीने ‘ममता’ बनण्यास अनुष्का शर्माने दिला होता नकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 20:25 IST

वरूण धवन आणि अनुष्का शर्मा स्टारर ‘सुई धागा’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला, या चित्रपटात वरूणने मौजी नावाच्या एका शिंप्याची तर अनुष्काने त्याची पत्नी ममताची भूमिका साकारली आहे. 

वरूण धवन आणि अनुष्का शर्मा स्टारर ‘सुई धागा’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला, या चित्रपटात वरूणने मौजी नावाच्या एका शिंप्याची तर अनुष्काने त्याची पत्नी ममताची भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर लोकांनी या ट्रेलरला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. १२ तासांपेक्षाही कमी वेळात २० लाखांवर लोकांनी हा ट्रेलर पाहिला. या चित्रपटाच्या निमित्ताने अनुष्का शर्माने पहिल्यांदा इतकी नॉन ग्लॅमरस भूमिका साकारली आहे. साहजिकचं तिच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. ही भूमिका करणे, एक आव्हान होते आणि अनुष्काने ते स्वीकारले, याबद्दलचं तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. पण तुम्हाला कदाचित माहित नसेल की आधी अनुष्काने ही भूमिका करण्यास नकार दिला होता. आज ट्रेलर लॉन्चदरम्यान खुद्द अनुष्कानेचं ही माहिती दिली.

 सुई धागा’चे दिग्दर्शक शरत कटारिया आणि मनीष शर्मा माझ्याकडे या चित्रपटाची आॅफर घेऊन आलेत, त्यावेळी मी या भूमिकेसाठी अजिबात तयार नव्हते. या भूमिकेला मी न्याय देऊ शकेल की नाही, ही भीती मला होती. तुमची कथा सुंदर आहे. यशराज बॅनरचा चित्रपट आहे. पण ही भूमिका माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या अगदी विरूद्ध आहे, असे मी त्यांना सांगितले. पण शरत आणि मनीष दोघांनाही माझ्यावर पूर्ण विश्वास होता. यानंतर शरत माझ्या घरी आला. त्याने मला बरेच समजावले आणि यानंतर कुठे मी या चित्रपटासाठी होकार दिला. आज मला अभिमान वाटतोय की, मी हा चित्रपट स्वीकारला, असे अनुष्काने सांगितले.

'मेड इन इंडिया' अशी टॅगलाइन असलेल्या या सिनेमाची कथा मध्य प्रदेशात रंगणार आहे. या ठिकाणी बहुतांशी नागरिक येण्या जाण्यासाठी सायकलचा वापर करतात. त्यामुळे सुई धागा सिनेमात वरुण-अनुष्का सायकलवर फिरताना पाहायला मिळणार आहेत. 

 

टॅग्स :अनुष्का शर्मा