Join us  

OMG! प्लास्टिक सर्जरीने बदलला या अभिनेत्रींचा चेहरा, विश्वास बसत नसेल तर पाहाच!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 8:00 AM

डोळ्यांवर बसणार नाही विश्‍वास....

ठळक मुद्देकंगना राणौत हिनेही आधी लिप सर्जरी केली. नंतर ब्रेस्ट इंप्लांट केले.

बॉलिवूड असो वा हॉलिवूड दोन्ही इंडस्ट्रीतील नट्या आपल्या सौंदर्याबद्दल अतिशय सजग दिसतात. अधिक सुंदर दिसण्यासाठी या नट्या वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात. कधी मेकअप तर कधी प्लास्टिक सर्जरी. प्लास्टिक सर्जरीचा आधार घेणा-या अनेक नट्या बॉलिवूडमध्ये आहेत. त्यांचे जुने फोटो आणि सर्जरीनंतरचे फोटो बघितल्यावर तुम्हाला तुमच्या डोळ्यांवरही विश्वास होणार नाही, इतका हा बदल थक्क करणारा आहे. आज अशाच काही अभिनेत्रींबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अनुष्का शर्मा

बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींमध्ये गणल्या जाणारी अनुष्का शर्मा हिने आपल्या ओळांची सर्जरी केली. काळासोबत ती बरीच बदलली.

कोएना मित्रा

कोएना मित्रा या अभिनेत्रीने तर प्लास्टिक सर्जरीच्या नावावर आपला चेहराच बिघडवून घेतला. होय, 2011 मध्ये तिने नाकाची सर्जरी केली. ती फसली आणि कोएनाचे फिल्मी करिअर उद्धवस्त झाले.

प्रियंका चोप्रा

बॉलिवूड ते हॉलिूड असा प्रवास करणा-या प्रियंकाने अनेकदा प्लास्टिक सर्जरी केली आहे. ओठ आणि नाकाची सर्जरी तिने केली. तिने जुने आणि आत्ताचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही हा बदल जाणवेल.

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी बॉलिवूडमध्ये आली, तेव्हा काही वेगळीच होती. सौंदर्य वाढवण्यासाठी शिल्पाने प्लास्टिक सर्जरीचा आधार घेतला. तिने नाकाची सर्जरी केली.

जान्हवी कपूर

जान्हवी कपूरने आपल्या लुक्सवर बरेच प्रयोग केले. तिनेही नाकाची आणि हनुवटीची प्लास्टिक सर्जरी केली.

मिनिषा लांबा

मिनिषा लांबा हिनेही नाकाची सर्जरी केलीय. यानंतर तिच्या लूकमध्ये प्रचंड बदल झाला.

आयशा टाकिया

कोएना मित्राप्रमाणेच आयशा टाकिया हिनेही प्लास्टिक सर्जरी केली. पण सुंदर दिसण्याच्या नादात तिचा चेहरा बदलला. नव्हे बिघडला.

कंगना राणौत

कंगना राणौत हिनेही आधी लिप सर्जरी केली. नंतर ब्रेस्ट इंप्लांट केले.

टॅग्स :अनुष्का शर्माकंगना राणौतआयशा टाकिया