Join us

Anupamaa: नंदिनीनंतर समरच्या आयुष्यात होणार या व्यक्तीची एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 13:15 IST

Anupamma: स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका 'अनुपमा' सतत चर्चेत येत असते. अनुपमाचा मुलगा म्हणजेच समरच्या आयुष्यात आणखी एका व्यक्तीची एन्ट्री होणार आहे.

स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका 'अनुपमा' सतत चर्चेत येत असते. रुपाली गांगुली आणि गौरव खन्ना यांच्या 'अनुपमा' मालिकेमध्ये सध्या अनुज आणि अनुपमाच्या लग्नाचे विधी सुरू आहेत. दोघांची मेहंदी आणि संगीत सेरेमनी नुकताच पार पडली. पण लग्नात विघ्न येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, अनुपमाच्या मुलगा म्हणजेच समरच्या आयुष्यात आणखी एका व्यक्तीची एन्ट्री होणार आहे. समरला सोडून नंदिनी परत अमेरिकेला गेल्यानंतर आता त्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी पाऊल टाकणार आहे.

समरच्या आयुष्यात येणारी ती तरूणी दुसरी कोणी नसून 'धडकन जिंदगी की'मधील अभिनेत्री अल्मा हुसेन असू शकते. अल्मा हुसैन रुपाली गांगुलीच्या 'अनुपमा' शोमध्ये एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती समरच्या आयुष्यात प्रेमाची नवीन उमेद आणेल, असे बोलले जात आहे. जेणेकरून निर्माते समरच्या आयुष्यात नवा ट्विस्ट देऊ शकतील. मात्र, याबाबत अद्याप अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.

रुपाली गांगुली आणि गौरव खन्ना यांच्या 'अनुपमा' मालिकेत अभिनेत्री अनघा भोसलेने नंदिनीची भूमिका साकारली होती, ज्यावर अनुपमाच्या मुलाचे प्रेम असते. पण अनघा भोसलेने टीव्ही आणि ग्लॅमरचे जग सोडून अध्यात्माचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत तिने सिनेइंडस्ट्रीला रामराम केला. नंदिनी गेल्यानंतर समरच्या आयुष्यात आतापर्यंत कोणीही प्रवेश केला नव्हता.पण अल्मा हुसेनच्या समरच्या आयुष्यातील एन्ट्रीनंतर मालिकेत नवा ट्विस्ट येईल, असे सांगितले जात आहे.

अल्मा हुसेन व्यतिरिक्त, अभिनेत्री अश्लेषा सावंत देखील रुपाली गांगुली स्टारर 'अनुपमा'मध्ये प्रवेश करू शकते. मात्र, तिच्या व्यक्तिरेखेबद्दल आणि एंट्रीबद्दल अधिकृतपणे काहीही समोर आलेले नाही.

टॅग्स :स्टार प्लस