Join us

मित्र असावा तर असा! सतीश कौशिक यांच्या लेकीला अनुपम खेर यांनी दिलं वचन, नेटकऱ्यांनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 08:56 IST

अनुपम खेर सतीश कौशिक यांच्या अत्यंत जवळचे होते.

बॉलिवूड अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचं ९ मार्च रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री शोकसागरात बुडाली. अनुपम खेर, अनिल कपूर, जावेद अख्तर सह अनेक अभिनेते त्यांचे जवळचे मित्र आहेत. अनुपम खेर (Anupam Kher) यांना तर आपल्या मित्राच्या निधनाने जबर धक्का बसला होता. अनुपम खेर त्यांच्या अत्यंत जवळचे होते. सतीश कौशिक यांना वंशिका ही लहान मुलगीही आहे. वंशिकासोबत सतीश कौशिक नेहमी रील्स बनवायचे. आता वंशिकाला बॉलिवूडमध्ये लॉंच करणार असल्याचं अनुपम खेर म्हणाले आहेत.

सतीश कौशिक यांची काही ना काही कारणाने सर्वच आठवण काढत असतात. अनुपम खेर नेहमी वंशिकासोबत वेळ घालवत असतात. तिला वडिलांची आठवण येऊ नये म्हणून तिला धीर देत असतात. नुकतंच अनुपम खेर यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.यामध्ये ते वंशिकाला विचारतात, 'तुला अभिनेत्री व्हायचे आहे का? जर तुला कधीही अभिनेत्री बनावं वाटलं तर मी तुला लॉंच करेन.' 

अनुपम खेर यांचा हा व्हिडिओ पाहून चाहतेही भावूक झाले. आयुष्यात आणि नंतरही मैत्री कशी टिकवावी याचंच उदाहरण अनुपम खेर यांनी दिलंय. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. यामध्ये वंशिकाची निरागसता दिसते तर अनुपम खेर यांना तिची किती काळजी आहे हे लक्षात येते. अनेक युजर्सने व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. 'देव सर्वांना अनुपम खेरसारखा मित्र देवो' अशा शब्दात त्यांनी अनुपम खेर यांचं कौतुक केलंय.

टॅग्स :अनुपम खेरसतीश कौशिकबॉलिवूड