Join us

किरण खेर यांच्याबाबत अनुपम खेर यांना विचारण्यात आला हा प्रश्न, त्यांनी उत्तर न देता म्हटले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 17:08 IST

अनुपम खेर नुकतेच पत्नी किरण खेरच्या प्रचारासाठी चंदीगडला गेले होते. त्यावेळी त्यांच्या पत्नीने संसदेपेक्षा अभिनय क्षेत्रात जास्त काळ कार्यरत असण्याबाबत त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला.

ठळक मुद्देअनुपम खेर यांनी काहीही उत्तर न देता भारत मात की जय एवढेच ते म्हणाले आणि तिथून ते निघाले. पण निघण्याआधी त्यांनी ज्या पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला होता, त्याच्या गालावर त्यांनी हात फिरवला आणि आपल्या गळ्यात असलेला पंचा त्याच्या गळ्यात घातला. 

अनुपम खेर यांची पत्नी अभिनेत्री किरण खेर यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्या चंदीगड मधून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजपाकडून निवडणूक लढवली होती आणि त्या विजेत्या देखील ठरल्या होत्या. किरण खेर खासदार असताना त्यांनी संसदेपेक्षा अधिक काळ हा अभिनयासाठी दिला असा आरोप त्यांच्यावर लावण्यात येत आहे. 

अनुपम खेर नुकतेच पत्नी किरण खेरच्या प्रचारासाठी चंदीगडला गेले होते. त्यावेळी त्यांच्या पत्नीने संसदेपेक्षा अभिनय क्षेत्रात जास्त काळ कार्यरत असण्याबाबत त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी काहीही उत्तर न देता भारत मात की जय एवढेच ते म्हणाले आणि तिथून ते निघाले. पण निघण्याआधी त्यांनी ज्या पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला होता, त्याच्या गालावर त्यांनी हात फिरवला आणि आपल्या गळ्यात असलेला पंचा त्याच्या गळ्यात घातला. 

अनुपम खेर आणि किरण खेर हे दोघी गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. अनुपम खेर यांनी तर अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. तसेच किरण खेर या देखील खूप चांगल्या अभिनेत्री आहेत. किरण खेर खासदार असताना संसदेत त्यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याची चांगलीच चर्चा झाली होती. चंदिगड बलात्कार प्रकरणी किरण खेर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. किरण खेर यांनी पीडित तरुणीला सल्ला देताना, ऑटोरिक्षात आधीपासूनच तीनजण बसले असताना पाहिल्यावर तिने रिक्षात बसायला नको होतं असं म्हटलं होतं. किरण खेर यांच्या या वक्तव्याचा चांगलाच निषेध करण्यात आला होता. त्यांच्यावर टीका देखील करण्यात आली होती. पण किरण खेर यांनी यावर स्पष्टीकरण देत याप्रकरणी राजकारण केलं जाऊ नये अशी विनंती केली होती. 'मी फक्त इतकंच म्हटलं होतं की, समाजात अनेक चुकीच्या गोष्टी घडत आहेत त्यामुळे मुलींनी काळजी घेणं गरजेचं आहे असं मला म्हणायचं होतं', असं किरण खेर यांनी त्यावेळी सांगितलं होतं. 

टॅग्स :किरण खेरअनुपम खेरभाजपालोकसभा निवडणूक २०१९