Join us

क्रितीचा ‘पत्ता कट’, आता ‘चेहरे’मध्ये दिसणार ही अभिनेत्री!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 08:00 IST

आपल्या नख-यांमुळे क्रिती खरबंदाने ‘चेहरे’ हा चित्रपट गमावला. आता तिच्या जागी या चित्रपटात एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.

ठळक मुद्दे‘चेहरे’ हा सिनेमा 24 एप्रिल 2020 ला रिलीज होणार आहे.

अभिनेत्री क्रिती खरबंदाचा ‘पागलपंती’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याशिवाय अमिताभ बच्चन व इमरान हाश्मी स्टारर ‘चेहरे’ या चित्रपटातही क्रितीची वर्णी लागली होती. पण चर्चा खरी मानाल तर आपल्या नख-यांमुळे तिने हा चित्रपट हातचा गमावला. आता तिच्या जागी या चित्रपटात एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ती म्हणजे, अंकिता लोखंडे.

होय, पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, निर्माता आनंद पंडित यांनी अंकिताचे नाव फायनल केले आहे. क्रितीला बाहेरचा रस्ता दाखवल्यावर आनंद यांनी अंकिताची भेट घेतली. अंकिताला चित्रपटाची कथा आवडली आणि तिने लगेच या चित्रपटाला होकार दिला. गतवर्षी अंकिताने ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटात तिने झलकारीबाईची भूमिका साकारली होती. लवकरच अंकिता ‘बागी 3’ या सिनेमातही झळकणार आहे.

आता ‘चेहरे’ या चित्रपटातही ती झळकणार आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही. पण ‘चेहरे’ची ऑफर आली असेलच तर ती अंकिता सोडायची नाही, हे मात्र नक्की.

क्रितीने ‘चेहरे’चे पहिल्या शेड्यूलचे शूटिंग पूर्ण केले  होते. चर्चेनुसार, क्रितीच्या सांगण्याप्रमाणे मेकर्सनी या सिनेमात अनेक बदल केले होते मात्र तरीही गोष्टी ठीक झाल्या नाहीत. क्रितीचा दिग्दर्शकासोबत वाद झाला. तो वाद इतक्या टोकाला गेला की तिला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.   

टॅग्स :अंकिता लोखंडेकृति खरबंदा