फिल्म इंडस्ट्रीमध्ये विविध धाटणीच्या कथा सादर केल्या जातात. आजकाल ओटीटी, वेबसीरिज म्हटलं की त्यात बोल्ड दृश्य हमखास असतातच. या दृश्यांशिवाय कथाच पूर्ण होत नाही, असाच मेकर्सचा समज असतो. अनेकदा कथेची मागणी नसतानाही सीरिज किंवा चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन्सचा भरणा असतो. याला अपवाद ठरलाय मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिचा नवरा हिमांशु मल्होत्रा (Himmanshoo Malhotra). हिमांशुनं बोल्ड सीन्स करायला एक नाही तर अनेकदा थेट नकार दिला आहे. याचा खुलासा खुद्द अभिनेत्यानं एका मुलाखतीमध्ये केला आहे.
हिमांशू यानं नुकतंच दैनिक जागरणशी बोलताना सांगितले, की त्याला काही सीरिज ऑफर करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये इंटिमेट सीन्स होते आणि त्यानं त्या नाकारल्या. यावेळी त्याने संबंधित सीरिजचे नावे घेण्याचे टाळले. तो म्हणाला, "पात्राची मागणी असेल, कथेची मागणी असेल, तर इंटिमेट करण्यास मला काही अडचण नाही. कोणतेही बंधन नाही. पण, ते विनाकारण करू नये. कथा वाचल्यानंतर हे स्पष्ट होते की काही गोष्टी जाणूनबुजून सनसनाटी करण्यासाठी जोडल्या गेल्या आहेत".
पुढे तो म्हणाला, "सीरिज या खळबळजनक बनवण्यासाठी इंटिमेट सीन्स जोडले जातात आणि जेव्हा कारण विचारलं जातं, तेव्हा उत्तर मिळत नाही". हिमांशूच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'राणा नायडू' (Rana Naidu Netflix) या लोकप्रिय सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये झळकला आहे. याआधी त्याचा 'केसरी वीर' चित्रपट प्रदर्शित झाला होता. हिमांशू हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. तो सिद्धार्थ मल्होत्राच्या 'शेरशाह' सिनेमात तो दिसला होता