Join us
Daily Top 2Weekly Top 5

KBC-14 च्या सेटवर अमिताभ बच्चन यांना दुखापत, पायाची नस कापली गेल्याने रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 14:29 IST

Amitabh Bachchan Hospitalise : यासंदर्भात स्वतः अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये खुलासा केला आहे. 

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना नुकतीच KBC या रिअॅलिटी शोच्या शूटिंगदरम्यान दुखापत झाली होती. त्याच्या पायाची नस कापली गेल्याने, त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासंदर्भात स्वतः अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये खुलासा केला आहे. 

केबीसीच्या सेटवर झाला अपघात -बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे, की त्यांच्या जखमेला काही टाके घालण्यात आले आहेत. आता आपण पूर्णपणे बरे आहोत आणि काळजी करण्यासारखे काहीही नाही. एवढेच नाही, तर आपल्याला ही दुखापत कशी झाली, हे देखील त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये सांगितले आहे.

अमिताभ यांना कशी झाली दुखापत? -बिग बींनी आपल्या ब्लॉगमध्ये सांगितले, की सेटवर बाहेर निघालेला एक धातूचा तुकडा त्यांच्या पायाला लागला. यामुळे त्यांच्या पायाची नस कापली गेली. त्यांना झालेल्या जखमेला टाके घालण्यात आले आहेत. यानंतर रक्तस्त्राव थांबला आहे.80 वर्षांचे आहेत अमिताभ बच्चन -अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे, की ते जेवढावेळ KBC च्या सेटवर राहतात तेवढावेळ त्यांची विशेष काळजी घेतली जाते. अमिताभ बच्चन नुकतेच 80 वर्षांचे झाले आहेत. यानिमित्ताने KBC च्या टीमने विशेष अॅपिसोडचे आयोजन केले होते. यात अभिषेक बच्चन आणि जया बच्चनही सहभागी झाले होते. 

टॅग्स :अमिताभ बच्चनबॉलिवूडकौन बनेगा करोडपतीहॉस्पिटल