Join us

ब्रrानंदम यांनी तोडले सर्व रेकॉर्ड

By admin | Updated: September 18, 2014 00:42 IST

तेलगू चित्रपटातील प्रसिद्ध कॉमेडियन ब्रrानंदम यांनी एक हजारहून जास्त चित्रपटांत काम करीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे.

तेलगू चित्रपटातील प्रसिद्ध कॉमेडियन ब्रrानंदम यांनी एक हजारहून जास्त चित्रपटांत काम करीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. नुकतेच त्यांचा साऊथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्डस्मध्ये बेस्ट कॉमेडियन या पुरस्काराने गौरव करण्यात आला. कॉलेजातील प्राध्यापकाची नोकरी सोडून ब्रrानंदम यांनी अभिनयात पदार्पण केले. कॉलेजमध्येही ते विद्याथ्र्याना मिमिक्री करून दाखवत असत, असे सांगितले जाते. त्याचदरम्यान त्यांना कॉलेजच्या एका नाटकात बेस्ट सपोर्टिग आर्टिस्टचा पुरस्कार मिळाला आणि तेव्हाच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आतार्पयत ब्रrानंदम यांनी एक हजारहून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. त्यांच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. यापूर्वी 2क्क्7 मध्ये एकाच भाषेत 7क्क् हून अधिक चित्रपटात काम करण्याच्या रेकॉर्डची नोंद झाली होती. चित्रपटातील ब्रrानंदम यांचे योगदान लक्षात घेत त्यांना 2क्क्9 मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते.