Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : आलिया भटच्या घरातील स्विमिंग पूलमध्ये दिसला साप; नीतू कपूर म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 17:01 IST

आलिया भटची आई सोनी रजदान यांनी दोन व्हिडीओ पोस्ट केले

लॉकडाऊनमुळे अनेकांना घरातच बसावे लागत आहेत. सेलिब्रेटी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपापल्या चाहत्यांसोबत संवाद साधत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटची आई सोनी रजदान यांही सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यांनी बुधवारी एक व्हिडीओ पोस्ट केला. त्या व्हिडीओत त्यांच्या घरातील स्विमिंग पूलमध्ये साप असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवर नीतू कपूर यांनी धक्का बसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

रजदान यांनी दोन व्हिडीओ पोस्ट केले. त्यातील एका व्हिडीओवर त्यांनी लिहिले की,''आमच्या घरातील स्विमिंग पूलमध्ये आज एक पाहूणा आलाय. त्याला पहिले पाणी प्यायचे होते आणि त्यानंतर त्यानं डुबकी मारली. त्यानंतर तो तिथून निघून गेला.'' त्यांच्या या पोस्टवर रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी कमेंट केली की,''हे भयानक आहे.''

पाहा व्हिडीओ...  

टॅग्स :आलिया भटबॉलिवूडसाप