Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलिया भट्टच्या या बॅगची किंमत वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 15:26 IST

आलियाच्या बॅगची किंमत वाचून तुम्हीही थक्क व्हाल इतकी ती महागडी आहे. नुकतीच ही बॅग घेऊन एअरपोर्टला दिसली. 

मुंबई : बॉलिवूड कलाकारांच्या वस्तूंची नेहमीच चर्चा होत असते. सध्या अभिनेत्री आलिया भट्टची एक बॅग चांगलीच चर्चेत आली आहे. आलियाच्या बॅगची किंमत वाचून तुम्हीही थक्क व्हाल इतकी ती महागडी आहे. नुकतीच ही बॅग घेऊन एअरपोर्टला दिसली. 

झालं असं की, आलियाचा बॉयफ्रेन्ड रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पॅरीसला गेले आहेत. या सेलिब्रेशनमध्ये सामिल होण्यासाठी आलियाही निघाली होती. पण तिचा एअरपोर्ट लूक आणि बॅग चांगलीच चर्चेत आली आहे. 

अशीही चर्चा आहे की, होणाऱ्या सासूच्या बर्थडेला जाण्यासाठी आलियाने ही खास बॅग खरेदी केली होती. या बॅगची किंमत १ लाख ६७ हजार रूपये इतकी सांगितली जात आहे. आलियाची ही ब्लॅक अॅन्ड व्हाईट रंगाची तेदर बॅग सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 

टॅग्स :आलिया भटबॉलिवूड