Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलिया भट्टच्या 'राझी'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच, केली इतकी कमाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 13:13 IST

मेघना गुलझार यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाचा हा पाचवा आठवडा सुरु आहे. गेल्या महिन्यात 11 मे रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता. 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या 'राझी' सिनेमाची अजूनही बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरु आहे. मेघना गुलझार यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाचा हा पाचवा आठवडा सुरु आहे. गेल्या महिन्यात 11 मे रोजी हा सिनेमा रिलीय झाला होता. 

गेल्या शुक्रवारी या सिनेमाने 45 लाख, शनिवारी 80 लाख आणि रविवारी 90 लाख रुपयांची कमाई करत या सिनेमाने आपला कमाईचा आकडा आणखी वाढवला आहे. सोमवारी या सिनेमाने 32 लाखांची कमाई केली. त्यानुसार या सिनेमाची आत्तापर्यंतची कमाई 120 कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. आलिया भट्टचा हा 100 कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा तिसरा सिनेमा ठरला आहे. 

याआधी आलिया आणि अर्जुन कपूरच्या '2 स्टेट्स' या सिनेमाने 102.13 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर वरुण धवन सोबतच्या बद्रीनाथ की दुल्हनिया सिनेमाने 116.68 कोटी रुपयांची कमाई केली होती. या दोन्ही सिनेमांच्या तुलनेत आलियाच्या राझीने सर्वात जास्त कमाई केली आहे. ट्रेड अॅनालिसिस्ट तरण आदर्श यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. 

टॅग्स :आलिया भटराझी सिनेमा