Join us

Video : फोटोग्राफरच्या वयस्कर आईला भेटली आलिया भट, विचारपुस करत म्हणाली, "आपका बेटा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 08:45 IST

एका इव्हेंटमध्ये आलियाने फोटोग्राफरच्या आईची विचारपुस करतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

अभिनेत्री आलिया भटने (Alia Bhat) नुकतीच मेट गाला २०२३ मध्ये हजेरी लावली. यावेळी आलियाचा ड्रीमी लुक बघायला मिळाला. १ लाख मोत्यांनी बनवलेल्या व्हाईट गाऊनमध्ये आलिया सुंदर दिसत होती. आलिया नेहमीच सर्वांशी आपुलकीने बोलते हे वेळोवेळी आपण सर्वांनी बघितलं आहे. नुकताच पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आला आहे. एका इव्हेंटमध्ये आलियाने फोटोग्राफरच्या आईची विचारपुस करतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

न्यूयॉर्कवरुन परतल्यानंतर आलियाने ग्लोबल स्पोर्ट्स पिकलबॉल चॅम्पियनशिपमध्ये हजेरी लावली. दिग्दर्शक शशांक खेतानला पाठिंबा देण्यासाठी ती तिथे पोहोचली होती. या इव्हेंटमध्ये ती एका फोटोग्राफरच्या आईला भेटते. वयोवृद्ध आईला भेटून ती त्यांची विचारपुस करते. तसंच तुमचा मुलगा त्रास देतो मला असंही गंमतीत म्हणते. नंतर म्हणते, नाही खूप चांगलं काम करतो तो. यानंतर ती त्यांच्यासोबत फोटो काढते आणि त्यांना सांभाळून घेऊन जा यांना असंही म्हणते. 

या व्हिडिओनंतर नेटकऱ्यांनी आलियाचं कौतुक केलं आहे. तर काही जणांनी पब्लिसिटीसाठी करते असं म्हणत टीकाही केली आहे. मात्र आलियाने तिच्या हजेरीने सर्वांचंच मन जिंकलंय. यावेळी आलियाने इव्हेंटमध्ये व्हाईट टीशर्ट आणि ब्लू जीन्स असा कॅज्युअल लुक केला होता. आलिया लवकरच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी','जी ले जरा' आणि हॉलिवूड फिल्म 'हार्ट ऑफ स्टोन'मध्ये दिसणार आहे.

टॅग्स :आलिया भटमुंबईव्हायरल फोटोज्