Join us

'आई कुठे काय करते'मध्ये अक्षया गुरवची एन्ट्री; अरुंधती-आशुतोषच्या संसारात येणार वादळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 17:30 IST

Akshaya gurav: या मालिकेत अक्षया महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'आई  कुठे काय करते' (aai kuthe kay karte). आतापर्यंत या मालिकेत देशमुख कुटुंबीय आणि अरुंधती यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. विशेष म्हणजे ही मालिका बऱ्याच काळापासून सुरु आहे. त्यामुळे या मालिकेत अनेक कलाकारांची एन्ट्री झाली. तर, काही कलाकारांची एक्झिटही झाली. यामध्येच आता अभिनेत्री अक्षया गुरवची या मालिकेत एन्ट्री होणार आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अक्षया गुरव हिची मालिकेत एन्ट्री झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे या मालिकेत अक्षया महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. परंतु, तिच्या येण्यामुळे अरुंधती-आशुतोषच्या आयुष्यात नवीन वादळ येणार आहे.

काही दिवसांपूर्वीच या मालिकेत अरुंधती आणि आशुतोष यांनी मनुला दत्तक घ्यायचा निर्णय घेतला. मात्र, ते मनुला दत्तक घेण्यापूर्वीच आता या मालिकेत तिच्या आईची एन्ट्री झाली आहे. अक्षया मुनच्या आईची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे आता या मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजनमधुराणी प्रभुलकरसेलिब्रिटी