Join us

अक्षय कुमारच्या 'रुस्तम'चा ट्रेलर आऊट

By admin | Updated: June 30, 2016 13:07 IST

अभिनेता अक्षय कुमारच्या बहुचर्चित 'रुस्तम' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला असून या रोमँटिक थ्रिलरमध्ये अक्षय कुमार रुस्तम पावरी या नेव्ही ऑफिसरची भूमिका साकारली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - अभिनेता अक्षय कुमारच्या बहुचर्चित 'रुस्तम' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला असून या रोमँटिक थ्रिलरमध्ये अक्षय कुमार रुस्तम पावरी या नेव्ही ऑफिसरची भूमिका साकारली आहे. 
पारसी समाजानं या देशाला दिलेल्या प्रचंड योगदानामुळे अक्षय पारसी लोकांचा फॅन असून पारसी अधिका-याची भूमिका साकारायला मिळत असल्यामुळे आपण खुश आहोत, असे त्याने म्हटले होते.  शांतताप्रिय पारसी समाजातील व्यक्तिची भूमिका करायला मिळत असल्यामुळे मला आनंद झाल्याची प्रतिक्रिया त्यानं व्यक्त केली होती. 
१२ ऑगस्ट रोजी  'रुस्तम' हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्या अक्षयसोबत इलियाना डिक्रूझ आणि इशा गुप्ता या दोघीही प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. 
एअर लिफ्ट या सत्यकथेवर आधारीत सिनेमातल्या रणजीत कटयालची भूमिका गाजवल्यानंतर रुस्तम पावरी ही देखील सत्यकथेवर आधारीत भूमिका अक्षय यशस्वी करून दाखवेल असा विश्वास त्याच्या चाहत्यांनी व्यक्त केला आहे. 
 
आणखी वाचा : 
 (रुस्तममध्ये नेव्ही ऑफिसरच्या भूमिकेत झळकणार अक्षय कुमार)