Join us
Daily Top 2Weekly Top 5

परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'मधून एक्झिट घेताच अक्षय कुमारला रडू कोसळलं, दिग्दर्शकाचा खुलासा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 16:47 IST

परेश रावल यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे सिनेमाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनाही धक्का बसला आहे. तर याबाबत समजताच अक्षय कुमारला रडू कोसळल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. 

'हेरा फेरी ३'मधून परेश रावल यांनी अचानक एक्झिट घेतल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. परेश रावल यांच्या एक्झिटमुळे आता 'हेरा फेरी ३'मध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि बाबुभैय्याचं त्रिकुट पाहायला मिळणार नाही. परेश रावल यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे सिनेमाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनाही धक्का बसला आहे. तर याबाबत समजताच अक्षय कुमारला रडू कोसळल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. 

"मला खूप दु:ख झालं आहे. मला धक्का बसला आहे. आमच्यापैकी कोणालाही परेशने याची कल्पना दिली नव्हती. ते मला कॉल करू शकत होते. मीडियाला सांगण्याआधी ते आम्हाला सांगू शकत होते. आम्ही अनेक वर्षांपासून मित्र आहोत. सगळ्या कलाकारांनी १० दिवस शूटिंग केलं होतं. त्यामुळेच अक्षयने फ्रँचायजीचे राइट्स घेतले होते", असं प्रियदर्शन यांनी सांगितलं. 

पुढे ते म्हणाले, "अक्षय तर रडत होता. तो मला म्हणाला की परेश आपल्यासोबत असं का करत आहेत? जेव्हा पण अक्षयने माझ्यासोबत काम केलं आहे. त्याने कोणाचाही रोल कमी केलेला नाही. तो दिग्दर्शकाच्या कामात मध्ये येत नाही. पेमेंटचाही काही इश्यू नाही. कॉन्ट्रॅक्टही साइन झाले होते. परेशने कधीच सांगितलं की नाही ते एक्झिट घेणार आहेत. जेव्हा मी त्यांना कॉल केला तेव्हा त्यांनी मला मेसेज करून कॉल न करण्यास सांगितलं. हा माझा निर्णय आहे, असं ते म्हणाले". 

टॅग्स :परेश रावलअक्षय कुमार