Join us

Akshay Kumar ने मालदीवमध्ये गायत्री मंत्राचा जप करत केलं नव्या वर्षाचं स्वागत, पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 16:09 IST

अक्षय (Akshay Kumar) मालदीववरुन आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतो आहे.

अक्षय कुमार (Akshay Kumar) कुटुंबासोबत मालदीवमध्ये व्हॅकेशनसाठी गेला आहे. ट्विंकल खन्ना आणि अक्षय दोघेही येथून बरेच व्हिडिओ आणि फोटो शेअर करत आहेत. अक्षय मालदीववरुन आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतो आहे. अक्षय कुमारने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तो नव्या वर्षाचे स्वागत धार्मित पद्धतीने करताना दिसतोय. 

व्हिडीओ व्हायरल या व्हिडीओमध्ये अभिनेता मालदीवमध्ये उगवत्या सूर्याकडे पाहून गायत्री मंत्राचा जप करताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये फक्त अक्षय कुमारची पाठ दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना अक्षय कुमारने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "नवीन वर्ष, तोच मी. उठलो आणि माझ्या जुन्या मित्र सूर्यासोबत नव्या वर्षाची सुरुवात केली. मला कोविड-19 व्यतिरिक्त सर्व गोष्टींची सकारात्मक सुरुवात करायची आहे."

अक्षय कुमारने पुढे लिहिले की, मी सर्वांना चांगले आरोग्य आणि आनंदासाठी शुभेच्छा देतो. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. असाच प्रेमाचा वर्षाव करत राहा. अलीकडेच अक्षय कुमार सारा अली खान आणि धनुषसोबत 'अतरंगी रे' चित्रपटात दिसला होता. एक अभिनेता म्हणून अक्षय कुमार त्याच्या सहकलाकारांमध्ये वयाच्या बाबतीत कधीही भेदभाव करत नाही.   वयाचा विचार करणे हे माझे काम नाही, असे अक्षय कुमार म्हणाला होता. तसे, वय ही अशी गोष्ट आहे की कुठेही फरक पडत नाही. हॉलीवूडचा चित्रपट असो किंवा जगातील इतर कोणताही चित्रपट.

टॅग्स :अक्षय कुमारमालदीव