बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी तूर्तास ‘सिम्बा’च्या बम्पर कमाईचे सेलिबे्रशन करतो. या चित्रपटानंतर लगेच रोहित आपल्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटात बिझी होणार आहे. रोहितच्या या चित्रपटात प्रथमचं अक्षय कुमार दिसणार आहे. पण काय तुम्हाला ठाऊक आहे की, निर्माता बोनी कपूरशिवाय रोहित व अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ पूर्ण होऊच शकला नसता. होय, याचे कारण म्हणजे ‘सूर्यवंशी’ नावाचाच एक चित्रपट अनेक वर्षांपूर्वी रिलीज झाला होता. या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत होता आणि विजय गलानीने हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. रोहितने ‘सूर्यवंशी’ नावाने चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यापुढे टायटलची समस्या उभी राहिली. कारण हे टायटल विजय गलानी यांनी कित्येक वर्षांपूर्वी रजिस्टर केले होते. अशास्थितीत बोनी कपूर रोहितच्या मदतीला धावून आले. त्यांनी विजय गलानींशी बोलून ही समस्या निकाली काढली. साहजिकचं इतकी मोठी समस्या सुटल्यानंतर ‘सूर्यवंशी’च्या कामाला गती मिळाली आहे.
बोनी कपूरच्या मदतीशिवाय पूर्ण होऊ शकला नसता ‘सूर्यवंशी’? वाचा संपूर्ण बातमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 15:18 IST
होय, निर्माता बोनी कपूरशिवाय रोहित व अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ पूर्ण होऊच शकला नसता.
बोनी कपूरच्या मदतीशिवाय पूर्ण होऊ शकला नसता ‘सूर्यवंशी’? वाचा संपूर्ण बातमी
ठळक मुद्देसूर्यवंशी’मध्ये फिमेल लीडचा रोल केवळ १५ ते २० मिनिटांचा आहे. म्हणजे, हिरोईनसाठी करण्यासारखे काहीही नाही. पण तरिही यात पूजा हेगडे असावी, अशी अक्षयची इच्छा आहे