Join us  

अक्षय कुमारच्या या अभिनेत्रीनं गुपचुप केलं लग्न, आता मालदिवमध्ये हनीमून करतेय एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 5:41 PM

अक्षय कुमारसोबत आवारा पागल दीवाना चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्रीने गुपचुप लग्न केलं.

बऱ्याच सिनेमात झळकलेली अभिनेत्री आरती छाब्रिया हिने २५ जून रोजी विशारदसोबत लग्न केलं. आरतीने पारंपारिक रिती रिवाजात लग्न केलं. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत. लग्नानंतर आरती नवऱ्यासोबत हनीमूनसाठी मालदीवला रवानादेखील झाली आहे. सोशल मीडियावर आरतीने हनीमूनचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आरती व विशारद रोमँटिक मूडमध्ये पहायला मिळाली. 

इंस्टाग्रामवर आरतीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये आरती बीचवर नवऱ्यासोबत पोझ देताना दिसली. तर काही फोटोंमध्ये विशारद तिचा हात पकडताना दिसला. या फोटोंमध्ये आरतीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. 

विशारद ऑस्ट्रेलियामध्ये टॅक्स कन्सल्टंटचा जॉब करतो. लग्नाचं बोलायचं तर या सोहळ्यावेळी आरतीनं लाल रंगाचा लहंगा परिधान केला होता तर विशारदने गुलाबी रंगाची शेरवानी घातली होती. आरतीने या वर्षी मार्चमध्ये विशारदसोबत गुपचुप साखरपुडा केला होता. आरतीच्या लग्नात छोट्या पडद्यावरील कलाकार शीना बजाज व रोहित पुरोहित पहायला मिळाले.

एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या साखरपुड्याच्या वृत्ताबाबत आरती छाब्रियाने सांगितले की, माझ्या कुटुंबाला वाटतं होतं की मला सर्वात चांगला मुलगा मिळणार. जेव्हा मी विशारदला भेटले तेव्हा मला जाणीव झाली की ज्या गोष्टीचं स्वप्न मी पाहत होते ते सर्व काही विशारदमध्ये आहे. स्वतःला मी खूप नशीबवान समजते की इतक्या मोठ्या प्रतीक्षेनंतर माझे अरेंज मॅरिज होत आहे.

आरतीने २०१० साली दस तोला चित्रपटातून फिल्मी करियरला सुरूवात केली होती. त्यानंतर मिलेंगे मिलेंगे, किससे प्यार करूं, हे बेबी, तुमसे अच्छा कौन है, लज्जा, शादी नंबर वन, पार्टनर यांसारख्या चित्रपटात ती झळकली होती.

तसे आरतीला करियरमध्ये हवे तितके यश मिळू शकले नाही.

आरतीचा सर्वात चर्चित चित्रपट आवारा पागल दीवाना होता. हा कॉमेडी चित्रपट होता.

ज्यात आरती अक्षय कुमारची हिरोईन बनली होती.

टॅग्स :अक्षय कुमारआरती छाबरिया