Join us
Daily Top 2Weekly Top 5

रितेश देशमुखला 'वेड'नंतर मराठीत साकारायची कॉमेडी भूमिका, म्हणाला- मराठीत विनोदाचा दर्जा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 17:31 IST

'वेड'ने बॉक्स ऑफिसवर ७४ कोटींचा गल्ला जमवला. यात रितेशने साकारलेल्या सत्या आणि जिनिलियाने साकारलेल्या श्रावणीने सगळ्यांचं वेड लावलं.

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख (Riteish Deshmukh Genelia Deshmukh) यांच्या 'वेड' ( Ved Movie) या सिनेमानं सर्वांनाच वेड लावलं. यासिनेमाने बॉक्स ऑफिसवर ७४ कोटींचा गल्ला जमवला. यात रितेशने साकारलेल्या सत्या आणि जिनिलियाने साकारलेल्या श्रावणीने सगळ्यांचं वेड लावलं. या चित्रपटातील रितेश-जिनिलियाची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली  मराठी रसिकांनी या सिनेमाला भरभरुन प्रेम दिलं. आतापर्यंत रितेशने मराठीत अॅक्शन आणि रोमाँटिक भूमिका साकारली आहे पण त्याला आता एक वेगळी भूमिका करायची आहे. दरवर्षी प्रमाणे यंदा ही झी मराठीचे चित्रगौरव पुरस्कार मोठ्या उत्साहात पार पडले. यासोहळ्या टीव्हीपासून सिने जगतापर्यंत अनेक सेलिब्रेटीनी हजेरी लावली होती. रितेश देशमुखने ही पत्नी आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुखसोबत रेड कार्पेटवर हजेरी लावली. रेड कार्पेटवर रितेशला विचारण्यात आलं की तू आतापर्यंतच्या करिअरमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहेस. पण तुमची कोणती इच्छा आहे की, मला ही भूमिका साकारायची आहे?

या प्रश्नाचे उत्तर देताना रितेश म्हणाला, मी 'लयभारी'मध्ये अ‍ॅक्शन केली 'वेड'मध्ये रोमाँटिक भूमिका केली आता मला मराठी विनोदी भूमिका करायची आहे. हिंदीत मी कॉमेडी रोल केले आहेत. पण मराठी अजून केले नाही आणि विनोदाचा दर्जा खूप वेगळा आहे. त्यामुळे मला विनोदी भूमिका साकारायची आहे.''

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजाझी मराठी