Join us
Daily Top 2Weekly Top 5

तान्हाजी फेम अभिनेत्री इलाक्षी गुप्ता आता करणार या मराठी चित्रपटातून पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 17:48 IST

सोयराबाईंची भूमिका इलाक्षीने साकारली होती. 'तान्हाजी' हा इलाक्षीचा पहिला सिनेमा होता.

बॉलीवूड चित्रपट "तान्हाजी : द अंसंग वारियर" मधून फिल्म इंडस्ट्री मधून पदार्पण करणारी इलाक्षी गुप्ता भरपूर लोकप्रियता मिळवली.तान्हाजी सिनेमामुळेच इलाक्षी प्रकाशझोतात आली. तिने याच सिनेमातून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. सोयराबाईंची भूमिका इलाक्षीने साकारली होती.  'तान्हाजी' हा इलाक्षीचा पहिला सिनेमा होता. सिनेमात रसिकांनी तिला मराठमोळ्या अंदाजात पाहिले. आता डॉक्टर इलाक्षी गुप्ता आपल्या चाहत्यांसाठी एक नवीन सिनेमाच्या माध्यमातून भेटीला येत आहे. अभिनेत्री इलाक्षी गुप्ताने बॉलिवूडमध्ये अभिनयाचा ठसा उमटल्यानंतर आता ती मराठी चित्रपट 'भ्रम'मधून मराठी सिनेमामध्ये पदार्पण करणार आहे.

डॉक्टर इलाक्षी गुप्ता चित्रपट 'भ्रम' मधून अभि आमकर सोबत दिसणार आहे व मराठी चित्रपटामध्ये पदार्पण करणार आहे.नुकतेच इलाक्षीने आपल्या सोशल मीडिया वरून चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही  फोटो शेर केले आहेत. 'भ्रम' ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन वैभव लोंढे ह्यांनी केले आहे, जे सुस्पेंस थ्रिलर आहे आणि इलाक्षी गुप्ताच्या पात्रशी जुळलेल आहे. हाच सिनेमा नाही तर  लवकरच इलाक्षी श्रेयस तळपदे सोबत हिंदी चित्रपट "लव्ह यु शंकर" मध्ये दिसणार आहे ज्याची शूटिंगसुद्धा पूर्ण झाली आहे.

सध्या इलाक्षीचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. साध्या आणि पारंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा बोल्ड अंदाजही रसिकांना भावतो. त्यामुळे बरेच फोटो सोशल मीडियावर आकर्षण ठरतात.  त्यामुळे आगामी काळात इतर अभिनेत्रींप्रमाणे इलाक्षीदेखील आपला सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि तसेच लक्षवेधी स्टाईल यामुळे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार हे मात्र नक्की.

 

इलाक्षी फिटनेस फ्रिक अभिनेत्री आहे. इलाक्षी दररोज नित्यनियमाने वर्कआऊट करते.सोशल मीडियावर तिने तिच्या फिटनेस टीप्सही शेअर करताना दिसते. 

टॅग्स :तानाजी