Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुरूची अडारकरनंतर आणखी एका मराठी अभिनेत्रीनं गुपचूप बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 12:14 IST

अभिनेत्री सुरुची अडारकरनंतर आता आणखी एका मराठी अभिनेत्रीने गुपचूप लग्नगाठ बांधली आहे आणि सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना खुशखबरी दिली आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या लगीनसराई पाहायला मिळत आहेत. नुकतेच बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांनी लग्न केले. त्यानंतर आता ६ डिसेंबर, २०२३ रोजी अभिनेत्री सुरुची अडारकर हिने अभिनेता पियुष रानडेसोबत गुपचूप लग्न केले आणि लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो पाहून चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. त्यानंतर आता आणखी एका मराठी अभिनेत्रीने गुपचूप लग्नगाठ बांधली आहे आणि सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना खुशखबरी दिली आहे.

सुरूचीनंतर आता कोणी लग्न केले, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. तर ही मराठमोळी अभिनेत्री म्हणजे मानसी मोघे. अभिनेत्री मानसी मोघे हिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. तिने सुर्या शर्मासोबत लग्न केले आहे. त्याने लग्नाचे फोटो शेअर करत कायमची माझी असं कॅप्शन दिले आहे. त्यांच्या या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. 

मानसी मोघेचा नवरा कोण आहे?अभिनेता मानसी मोघेचा नवरा सुर्या शर्मादेखील अभिनेता आहे. त्याने बऱ्याच वेबसीरिजमध्ये काम केले आहे. यात अनदेखी, ये काली काली आँखे, हॉस्टेजेस आणि ब्राउन या सीरिजचा समावेश आहे.

मानसी मोघेच्या वर्कफ्रंटबद्दल...

अभिनेत्री मानसी मोघे हिने २०१५ साली 'बुगडी माझी सांडली गं'मधून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. या चित्रपटानंतर ती २०१६ साली आणखीन एका मराठी चित्रपटात झळकली. त्यानंतर ती मराठी सिनेसृष्टीत काम करताना दिसली नाही. तिने 'ख्‍वाबों के परिंदे' या वेबसीरिजमध्ये काम केले आहे.

टॅग्स :मानसी मोघेसुरुची आडारकरपियुष रानडे