Join us

शाहरुख खाननंतर रितेश देशमुखही साकारणार बुटक्याची भूमिका!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 12:52 IST

लवकरच शाहरुख खान ‘झिरो’ या चित्रपटात बुटक्या व्यक्तिची भूमिका साकारताना दिसणार आहे आणि ताजी बातमी म्हणजे, शाहरुखपाठोपाठ रितेश देशमुख हाही आपल्या आगामी चित्रपटात अशीच भूमिका साकारणार आहे.

ठळक मुद्दे होय, दिग्दर्शक मिलाप जवेरी यांच्या ‘मरजांवा’ या चित्रपटात रितेश देशमुख बुटक्या व्यक्तिची भूमिका वठवणार आहे. या चित्रपटात रितेशसोबत सिद्धार्थ मल्होत्रा आणि तारा सुतारिया लीड रोलमध्ये आहेत.

कमल हासन यांनी ‘अप्पू राजा’ या चित्रपटात बुटक्याची भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेल्या बुटक्याच्या भूमिकेचे अपार कौतुक झाले होते. यानंतर २००६ साली आलेल्या ‘जाने मन’ या चित्रपटात अनुपम खेर हे बुटक्याच्या भूमिकेत दिसले होते. लवकरच शाहरुख खान ‘झिरो’ या चित्रपटात बुटक्या व्यक्तिची भूमिका साकारताना दिसणार आहे आणि ताजी बातमी म्हणजे, शाहरुखपाठोपाठ रितेश देशमुख हाही आपल्या आगामी चित्रपटात अशीच भूमिका साकारणार आहे. होय, दिग्दर्शक मिलाप जवेरी यांच्या ‘मरजांवा’ या चित्रपटात रितेश देशमुख बुटक्या व्यक्तिची भूमिका वठवणार आहे. या चित्रपटात रितेशसोबत सिद्धार्थ मल्होत्रा आणि तारा सुतारिया लीड रोलमध्ये आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  ‘मरजांवा’ पे्रमत्रिकोण असलेली एक रोमॅन्टिक कथा आहे.  ‘मरजांवा’ हा चित्रपट पुढील वर्षी २ आॅक्टोबरला रिलीज होईल. निखील अडवाणी हा चित्रपट प्रोड्यूस करतोय.

सिद्धार्थ व रितेश ही जोडी याआधी एकत्र दिसली होती. ‘एक विलेन’ या चित्रपटात या जोडीने काम केले होते. या चित्रपटात रितेश निगेटीव्ह रोलमध्ये होता. पण  ‘मरजांवा’मध्ये तो एका वेगळ्या अंदाजात दिसेल. रितेशने याची तयारीही सुरू केली आहे. तूर्तास रितेश या भूमिकेबद्दल काहीही बोलायला तयार नाही. पण या नव्या भूमिकेमुळे तो जाम आनंदात आहे. सध्या रितेश ‘माऊली’ या आपल्या आगामी मराठी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. हा चित्रपट मराठीतील आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा ‘बिग बजेट’ चित्रपट आहे. आधी ‘माऊली’ शाहरूख खानच्या ‘झिरो’सोबत येत्या २१ डिसेंबरला रिलीज होणार होता. पण त्यामुळे ‘झिरो’ची महाराष्ट्रातील कमाई प्रभावित झाली असती. हे टाळण्यासाठी रितेशने आपला चित्रपट १४ डिसेंबरला रिलीज करण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :रितेश देशमुखशाहरुख खानझिरो सिनेमा