आमिर खानचा २०२२ साली आलेला 'लाल सिंग चढ्ढा' रिलीज झालेला. हा सिनेमा त्यावर्षातला बहुचर्चित सिनेमा होता. परंतु सिनेमा फ्लॉप झाला. अपेक्षेपेक्षा सिनेमाने फारच कमी कमाई केली. लोकांचाही सिनेमाला कमी प्रतिसाद होता. मराठमोळा अभिनेता अतुल कुलकर्णीने हा सिनेमा लिहिला होता. गेल्या काही दिवसांमध्ये आमिर खानने सिनेमा फ्लॉप झाल्याबद्दल त्याचं मत सगळीकडे मत मांडलं. परंतु सिनेमाचा लेखक अतुल कुलकर्णीला काय वाटलं, याबद्दल त्याने पहिल्यांदाच मौन सोडलंय.
अतुल कुलकर्णी काय म्हणाला
आमिर खानने जाहीरपणे अनेक ठिकाणी सांगितलंय की, त्याच्या परफॉर्मन्समुळे लाल सिंग चढ्ढा पडला. यावर अतुल कुलकर्णींनी सहमती दर्शवली. अमोल परचुरेंच्या कॅचअप चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अतुल कुलकर्णी म्हणाले की, "आमिर जे म्हणतोय त्याच्या परफॉर्मन्सच्या बाबतीत ते मला मान्य आहे. आमिर ४ वर्ष एक सिनेमा घेऊन त्याचा या सर्व प्रोसेसमध्ये एक सहभाग होता. लेखक म्हणून स्क्रीप्ट लिहिल्यावर माझं तसं काम संपलं होतं. मला अर्थातच वाईट वाटलं. माझ्या दृष्टीने खूप महत्वाचा सिनेमा आहे. आमिर - मी दहा वर्ष वाट बघितली होती. त्यामुळे वाईट वाटलं. चालला असता जास्त छान वाटलं असतं."
"मी खरंतर कोणाशी तितका अटॅच होत नाही. वस्तू, व्यक्ती अशा गोष्टींशी अटॅच होण्याचा माझा स्वभाव नाहीये. आमिर खूप इमोशनल आहे. त्याच्या स्वभावाच्या दृष्टीने त्याची सिनेमा रिलीज झाल्यावर जी अवस्था झाली ती जवळून पाहत होतो मी. माझा स्वभाव तसा नाहीये." अशाप्रकारे अतुल कुलकर्णींनी त्यांचं रोखठोक मत मुलाखतीत मांडलं. अतुल यांची भूमिका असलेली 'बंदिश बँडिट्स २' वेबसीरिज रिलीज झालीय.