Join us

'गोलमाल'नंतर आता होणार 'टोटल धमाल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 21:00 IST

'टोटल धमाल' सिनेमा येत्या २२ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.

ठळक मुद्देविनोदाने परिपूर्ण 'टोटल धमाल' सिनेमा

‘संगीता अहिर मुव्हि़ज’ या भारतीय फिल्म प्रॉडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन कंपनीने आतापर्यंत बॉलिवूड, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी अनेक मनोरंजक सिनेमे आणले आहेत. नवीन वर्षाची धमाल सुरुवात देखील संगीता अहिर मुव्हि़जने केली आहे. कारण इंद्र कुमार दिग्दर्शित 'टोटल धमाल' या आगामी बॉलिवूड सिनेमाची सहनिर्मिती संगीता अहिर मुव्हि़जने केली असून संगीता अहिर या सिनेमाची सहनिर्माती आहे.

अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, रितेश देशमुख, महेश मांजरेकर, अर्षद वारसी आदी कलाकारांची प्रमुख भूमिका असलेला 'टोटल धमाल' सिनेमा येत्या २२ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. संगीता अहिर यांनी अजय देवगणच्या 'गोलमाल अगेन' या सिनेमाची पण निर्मिती केली आहे. संगीता अहिर मुव्हि़जचे अजय देवगणसोबत बेस्ट असोसिएशन असल्यामुळे अजय देवगणच्या या सिनेमातही निर्माती संगीता अहिर यांचा देखील मोलाचा वाटा आहे. त्यामुळे गोलमाल नंतर आता नवीन वर्षात पुन्हा एकदा होणार आहे ‘टोटल धमाल’.

टोटल धमाल’ हा सिनेमा 'धमाल' फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट आहे. या फ्रेंचाइजीचा दुसरा सिनेमा ‘डबल धमाल’ होता. इंदर कुमारने काही दिवसांपूर्वी मीडियाशी बोलताना सांगितले होते की, अनिल आणि माधुरी दीक्षित जवळपास 26 वर्षांनंतर एकत्र शूट करतायेत. आम्ही तिघांनी बेटा चित्रपटात एकत्र काम केले होते. ज्याला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले होते. टोटल धमालमध्ये माधुरी आणि अनिल कपूर दोघे नवरा-बायकोच्या भूमिकेत दिसणार आहेत. अनिल कपूर यात अविनाश नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारतो आहे. 

 

टॅग्स :माधुरी दिक्षितअर्शद वारसीअजय देवगण