सर्जिकल स्ट्राईकवर बनलेला ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर प्रचंड गाजला. जानेवारीत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बक्कळ कमाई केली. चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल याचेही प्रचंड कौतुक झाले. ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’च्या या यशानंतर आता बालाकोट एअर स्ट्राईकवर चित्रपट बनवण्याची तयारी सुरु झाली आहे.गत १४ फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत भारतीय वायु सेनेच्या लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुज्झफराबादमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर १००० किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. हवाई दलाच्या याच कारवाईवर चित्रपट बनवण्याची तयारी बॉलिवूडने चालवली आहे.
‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ नंतर बालाकोट एअर स्ट्राईकवरही बनणार चित्रपट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 13:19 IST
‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’च्या या यशानंतर आता बालाकोट एअर स्ट्राईकवर चित्रपट बनवण्याची तयारी सुरु झाली आहे.
‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ नंतर बालाकोट एअर स्ट्राईकवरही बनणार चित्रपट?
ठळक मुद्देचर्चा खरी मानाल तर संजय लीला भन्साळी, भूषण कुमार आणि महावीर कपूर हे हा चित्रपट प्रोड्यूस करणार आहेत. तर ‘केदारनाथ’चे दिग्दर्शक अभिषेक कपूर हे हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत.