Join us  

धर्मेंद्र यांच्यानंतर आता हेमा मालिनीदेखील सिनेमात करणार लिपलॉक, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 10:25 AM

Rocky Aur Rani Ki Prem Kahani : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनची खूप चर्चा झाली होती. यावर सनी देओलपासून ते हेमा मालिनीपर्यंत सगळ्यांनीच प्रतिक्रिया दिल्या होत्या.

करण जोहर(Karan Johar)च्या रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Ki Kahani) या चित्रपटाची प्रेमकहाणी अलीकडेच चर्चेत आली होती. धर्मेंद्र (Dharmendra) आणि शबाना आझमी (Shabana Azmi) यांच्या किसिंग सीनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याचबरोबर धर्मेंद्र यांच्यानंतर त्यांची पत्नी हेमा मालिनी(Hema Malini)ही मोठ्या पडद्यावर लिप लॉक करताना दिसणार आहेत.

हेमा मालिनी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनवर प्रतिक्रिया दिली. इंडिया.कॉमशी केलेल्या संभाषणात, त्यांनी सांगितले की, चित्रपटाची मागणी असल्यास त्यांना ऑनस्क्रीन किस करायला हरकत नाही. जेव्हा हेमा मालिनी यांना एका मुलाखतीत विचारण्यात आले की, धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्यासारखे ऑनस्क्रीन किस घेणे त्यांना सोयीचे आहे का, तेव्हा त्यांनी होकारार्थी उत्तर दिले, "का नाही, नक्कीच होईल. जर ते चांगले आणि संबंधित असेल. चित्रपटाशी जुळते असेल, तर कदाचित मी ते करू शकते.

हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर सांगितले की, त्यांनी अद्याप रॉकी और रानी की प्रेम कहानी पाहिला नाही. काही दिवसांपूर्वी झूमशी बोलताना हेमा मालिनी यांनी सांगितले की, मला खात्री आहे की लोकांना हा चित्रपट आवडला आहे. मी धरम जींसाठी खूप आनंदी आहे कारण त्यांना पूर्णवेळ कॅमेरासमोर राहणे आवडते.

चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनरॉकी और रानी की प्रेम कहानीबद्दल सांगायचे झाले तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा व्यवसाय केला आहे. आता चित्रपट १५० कोटी कमावण्याचा प्रयत्न करत आहे कारण या चित्रपटाचे कलेक्शन १४७ कोटींवर पोहोचले आहे. या चित्रपटात आलिया भट आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये जया बच्चन यांच्यासह धर्मेंद्र आणि शबाना आझमी देखील आहेत. या चित्रपटात जया बच्चन धर्मेंद्र यांच्या पत्नीच्या भूमिकेत आहेत.

टॅग्स :हेमा मालिनीधमेंद्रशबाना आझमी